ETV Bharat / state

सांगलीत कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; ६३ नव्या रुग्णांची वाढ झाल्याने रुग्णसंख्या हजारांच्या पार - सागंली लेटेस्ट न्यूज

रविवारी जिल्ह्यात ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सागंलीमध्ये ६३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने रुग्णसंख्येने एक हजारांचा टप्पा पार केला आहे. रुग्णसंख्या १०१३ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात सध्या ५४५ जणांवर उपचार सुरु असून ४३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Sangli corona update
सांगली कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 20, 2020, 8:38 AM IST

सांगली- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरुच आहे. रविवारी एकाच दिवसात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ६३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. वाढलेल्या रुग्णांमध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील ४० जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील अ‌ॅक्टिव्ह रुग्णसंख्या ५४५ झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्येने एक हजारांचा टप्पा केला आहे. जिल्ह्यात सध्या १०१३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

सांगली जिल्ह्यात रविवारी उपचार घेणाऱ्या ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील ७० वर्षीय वृद्ध व्यक्ती तर मिरज शहरातील ४८ वर्षीय पुरुष व ६५ पुरुष आणि मिरज तालुक्यातील ३४ वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा ३३ झाला आहे. जिल्ह्यात ४३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

रविवारी दिवसभरात आणखी ६३ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील तब्बल ४० जणांचा समावेश आहे. ज्यामध्ये सांगली शहरातील २५ आणि मिरज शहरातील १५ जणांचा समावेश आहे.सांगली शहरात खाणभाग,भावे हॉस्पिटल परिसर, रतनशीनगर, संजयनगर, घनश्याम नगर, गवळी गल्ली, सांगलीवाडी, अष्टविनायक चौक, बायपास रोड येथे कोरोना रुग्ण आढळले आहेत.

मिरज शहरातील कमानवेस ,शास्त्री चौक, बेथेलहमनगर समतानगर, भारती हॉस्पिटल स्टाफ येथे कोरोना रुग्ण आढळले आहेत.

कोरोना उपचार घेणारे १७ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. यापैकी ९ जण हे ऑक्सिजनवर तर ८ जण हे नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुक्यांत रविवारी आढळलेले कोरोना रुग्ण -

आटपाडी तालुका - नेलकरंजे १

कवठेमहांकाळ तालुका - आरेवाडी १,आगळगाव १

कडेगाव तालुका - कडेगाव शहर १

खानापूर तालूका - खानापूर ६ ,मादळमुठी १

मिरज तालुका - कवठेपिरान ३,भोसे २

शिराळा तालुका - शिराळा १ ,कुंभारवाडी २

तासगाव तालुका - तासगाव शहर १ ,सावळज १

वाळवा तालुका - शिगाव १,वाटेगाव १

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.