सांगली - कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून संचारबंदी लागू असतानाही चाळीस पेक्षा जास्त लोकांना ट्रकमधून बेकायदेशीर नेल्या प्रकरणी चालकासह चौघांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई येथून शेडगेवाडी या ठिकाणी येत असताना सकाळी दहाच्या सुमारास सांगली-सातारा सिमेवर असणाऱ्या मेणी फाटा (ता. शिराळा) येथे पोलिसांनी ट्रक थांबवून चौकशी केली. त्यावेळी ट्रकमध्ये 42 लोक मिळून आले. हे सर्वजण शेडगेवाडी येथील रहिवासी आहेत.
देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असताना अटकेतील चौघे मालवाहू ट्रकमधून प्रवासी वाहतूक करत होते. यामुळे त्यांच्या विरोधात पोलीस नाईक शिवाजी जाधव यांच्या तक्रारीवरून कोकरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार गंवडी करत आहेत.
हेही वाचा - सामाजिक बांधिलकी, कुरपळमधील ३५ तरुणांनी केले रक्तदान