ETV Bharat / state

नियम-अटी पाळा.. अन्यथा पुन्हा लॉकडाऊन; सांगलीकरांना जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा - सांगली लॉकडाऊन

सांगली जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रात गेले काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परंतु तरी देखील अनेक नागरिक प्रशासनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात गर्दी करत आहेत. त्यामुळे परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती निर्माण झाली आहे. कोरोनाचे नियम नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पाळावेत, अन्यथा जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करावे लागेल, असा इशारा सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी अभिजित चौधरी
जिल्हाधिकारी अभिजित चौधरी
author img

By

Published : Jul 17, 2020, 6:57 AM IST

सांगली - कोरोनाचे नियम नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पाळावेत, अन्यथा जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करावा लागेल, असा इशारा सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि नागरिकांकडून कोरोना नियमांचे होणारे उल्लंघन या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा इशारा दिला आहे. सांगली जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रात गेले काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परंतु तरी देखील अनेक नागरिक प्रशासनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात गर्दी करत आहेत. त्यामुळे परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना लॉकडाऊनचा इशारा दिला आहे.

नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. त्यासाठी सार्वत्रिक सामाजिक दबाव निर्माण करावा, मास्कचा वापर करावा, असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी केले आहे. तसेच येत्या काही दिवसात या बाबींकडे दुर्लक्ष केल्यास आणि अनावश्यक गर्दी केल्यास जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करणे हा अंतिम पर्याय राहील, असे ते म्हणाले.

ताप, सर्दी, खोकला, डायरिया, स्नायूदुखी, मानसिक गोंधळलेली स्थिती आदी लक्षणे जाणवल्यास तात्काळ फीवर क्लिनिक, आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. तर 50 वर्षावरील व कोमॉर्बिडिटी असणाऱ्या रूग्णांनी कोणतेही दुखणे अंगावर काढू नये. त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच खाजगी डॉक्टरांनी कोरोनाची लक्षणे असणारा रूग्ण तपासणीसाठी त्यांच्याकडे आल्यास त्वरीत डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलकडे पाठवावा. त्यामुळे लवकर निदान होऊन उपचार सुरू होतील, असे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी म्हणाले. यापुढे जिल्ह्यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची सक्तीने अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.