सांगली - जिल्ह्यातून पुरात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला वळवण्यात आले आहे. म्हैसाळ आणि टेंभू सिंचन योजना आजपासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पुराचे पाणी दुष्काळी भागाला पोहोचत आहे. जिल्ह्यातल्या 6 तालुक्यांसोबतच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याला याचा फायदा होणार आहे. दोन दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पुराचे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.
सांगलीतील वाहून जाणारे पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे रवाना; म्हैसाळ आणि टेंभू सिंचन योजना सुरू - varna river
सध्या कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणीपातळी वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणी कर्नाटक राज्यात वाहून जात आहे, त्यामुळे हे पाणी दुष्काळी भागाला देण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. यंदा पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय राज्याचे जलसंपदा जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ आणि टेंभू योजना आता सुरू झाल्या आहेत.
![सांगलीतील वाहून जाणारे पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे रवाना; म्हैसाळ आणि टेंभू सिंचन योजना सुरू flood-water-from-sangali-diverted-to-six-drought-tehsil-including-sangola](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8464339-269-8464339-1597746772383.jpg?imwidth=3840)
सांगलीतील वाहून जाणारे पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे रवाना