ETV Bharat / state

महापुराची स्थिती अंगावर काटा आणणारी - ऊर्मिला मातोंडकर

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज(14 ऑगस्ट) सांगलीत पूर परिस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांशी संवाद साधला. सांगलीतील महापुराची स्थिती पाहून आपल्या अंगावर काटा आला आहे, अशा शब्दात उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, राज्य सरकारने पूरग्रस्तांना सर्वोत्तपरी मदत करणे आणि त्यांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

महापुराची स्थिती अंगावर काटा आणणारी - ऊर्मिला मातोंडकर
author img

By

Published : Aug 14, 2019, 4:53 PM IST

सांगली - अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज(14 ऑगस्ट) सांगलीत पूर परिस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांशी संवाद साधला. सांगलीतील महापुराची स्थिती पाहून आपल्या अंगावर काटा आला, अशा शब्दात उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, राज्य सरकारने पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करणे आणि त्यांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

महापुराची स्थिती अंगावर काटा आणणारी - ऊर्मिला मातोंडकर

शहरातील पूर बाधित सांगलीवाडी आणि गणपती पेठ या भागात उर्मिला यांनी भेट दिली. त्यांनी यावेळी नागरीक आणि स्थानिक व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्याकडून पूर परिस्थितीची भीषणता जाणून घेतली. त्यानंतर बोलताना उर्मिला म्हणाल्या, 'सांगलीकरांचा संपूर्ण संसार आणि व्यापार महापुरात वाहून गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने या सर्वांना मदत करावी. अनेक ठिकाणी सरकारची मदत पोहोचलेली नाही. सरकारने तत्काळ गरजूंपर्यंत मदत पोहोचवावी.'

याप्रसंगी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Intro:सरफराज सनदी -

Feed send FTP

File name _ mh_sng_01_urmial_matodkar_on_sangli_flood_vis_1_7203751 -
mh_sng_01_urmiala_matodkar_on_sangli_flood_byt_5_7203751

स्लग - महापुराचे स्थिती अंगावर काटा आणणारी - ऊर्मिला मातोंडकर

अँकर - सांगलीच्या महापुराची स्थिती पाहून आपल्या अंगावर काटा आला आहे,अशा शब्दात प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, तसेच राज्य सरकारने पूरग्रस्तांना सर्वोत्तपरी मदत करून पुनर्वसन करणे खूप गरजेचे असल्याचे मतही व्यक्त केला आहे. उर्मिला मातोंडकर यांनी आज सांगलीत या पूर परिस्थितीची पाहणी करत पूरग्रस्तांची संवाद साधला आहे त्याप्रसंगी ते बोलत होत्या.Body:सांगलीच्या महापुराची परिस्थितीची आज प्रसिद्ध अभिनेत्री काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांनी पाहणी केली आहे. सांगलीवाडी आणि शहरातील गणपती पेठ या ठिकाणी पूर बाधित झालेल्या भागाची पाहणी करून पूरग्रस्तांशी संवाद साधला आहे. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.उर्मिला मातोंडकर यांनी यावेळी व्यापारी आणि सामान्य पूरग्रस्तांची संवाद साधत त्यांच्याकडून या पूर परिस्थितीची भीषणता जाणून घेतली त्यानंतर बोलताना आज पूर ओसरल्यानंतर या ठिकाणी आपण पोहोचलो ,मात्र जी परिस्थिती आहे ती पाहून अंगावर काटे येतात, अशा शब्दात या पूरस्थितीचा वर्णन ऊर्मिला मातोंडकर यांनी केलेला आहे.तर संपूर्ण संसार आणि व्यापार महापुरात वाहून गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने या सर्वांना सर्वोतपरी मदत करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी सरकारची मदत पोहोचत नाही. त्यामुळे याबाबत सरकारने काळजी घ्यावी आणि ती मदत पोहोचावी त्याचबरोबर या सर्व पूरग्रस्तांचे पुनर्वसन करणं खूप गरजेचं असल्याचं मत उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.