मुंबई- शहरातील ४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. या चारही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, सांगलीत एकाच कुटुंबातील ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ११६ इतकी झाली आहे.
मुंबईतील ४ रुग्णांचा कोरोना अहवाल नुकताच प्राप्त झाला असून त्या चौघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समार आले आहे. तर, सांगलीत एकाच कुटुंबातील ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. इस्लामपूर येथील हे नागरिक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बाधित कुटुंबातील काही सदस्य सौदी अरेबिया येथे गेलेले होते. ते परतल्यानंतर कुटुंबातील या ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ११६ इतकी झाली आहे. यापैकी १४ सदस्य बरे होऊन रुग्णालयातून सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.