ETV Bharat / state

पाण्याच्या खणीशेजारी लघुशंका करायला गेलेले आजोबा पडले पाण्यात; अग्निशमन दलाने केली सुटका - Old Man

लघुशंका करण्यासाठी गेलेले शामराव साबळे तोल जाऊन खोल पाण्यात पडले. मात्र, पोहता येत असल्याने त्यांनी खणीत असणाऱ्या बोटीला पकडून जीव वाचवण्यासाठी धावा सुरु केला. सांगली पोलीस आणि अग्निशमन दलाने त्यांना पाण्यातून सुखरुप बाहेर काढले.

शामराव साबळे
author img

By

Published : Jul 24, 2019, 9:13 PM IST

सांगली- पाण्याच्या खणी शेजारी लघुशंका करणे एका आजोबांच्या जीवावर बेतल्याची घटना घडली. लघुशंका करताना तोल जाऊन ते पाण्याच्या खणीत पडले, त्यांना एक तास जीव वाचवण्यासाठी अडकून पडावे लागले. अग्निशमन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून आजोबांची सुटका केली.

पाण्यात पडलेल्या आजोबांची सुटका

सांगलीच्या पुष्पराज चौकाशेजारी असणाऱ्या काळी खण या पाण्याच्या खणीत शामराव साबळे हे लघुशंकेसाठी गेले होते. यावेळी तोल जाऊन ते खोल पाण्यात पडले, त्यामुळे साबळे चांगलेच घाबरले होते. मात्र, त्यांना पोहता येत असल्याने ते पोहत पोहत खणीच्या मध्यभागी असणाऱ्या कारंजाच्या बोटीकडे गेले आणि बोटीला पकडून त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी मदतीसाठी धावा सुरू केला. रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकांना त्यांनी ओरडून आपला जीव वाचवण्याची विनवणी सुरू केली. मात्र, हे अंतर खूपच लांब असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांपर्यंत त्यांची हाक पोहचू शकली नाही.

अर्ध्या तासानंतर काही नागरिकांना साबळे पाण्यात अडकल्याचे निदर्शनास आले. नागरिकांना सांगली पोलीस आणि अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. यानंतर या ठिकाणी पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ दाखल झाले. त्यांनी पाण्यात अडकलेल्या साबळे यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. खोल असणाऱ्या खणीला कोणताच कठडा नसल्याने दोरीच्या सहाय्याने उतरून बोटीद्वारे साबळे यांना सुरक्षितपणे पाण्यातून बाहेर काढत त्यांची सुखरूप सुटका केली आहे. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

AVB

Feed send file name - mh_sng_05_old_man_in_waterdam_use_redy_1_7203751

स्लग - पाण्याच्या खणी शेजारी लघुशंका करणे आजोबांच्या बेतले जीवावर,एक तास पाण्यात अडकून पडलेल्या आजोबांची रेस्क्यू करत केली सुटका...

अँकर - पाण्याच्या खणी शेजारी लघुशंका करणे एका आजोबांच्या जीवावर बेतले आहे.लघुशंकेसाठी करताना तोल जाऊन पाण्याच्या खणीत पडून तब्बल एक तास जीव वाचवण्यासाठी अडकून पडावे लागले,अखेर अग्निशमन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवले पाण्यात पडलेल्या व्यक्तीच्या सुखरूप सुटका केली आहे. सांगली मध्ये ही घटना घडली आहे.
Body:
व्ही ओ - सांगलीच्या पुष्पराज चौका शेजारी असणाऱ्या काळी खण या पाण्याच्या खणीत शामराव साबळे हे इसम लघुशंकेसाठी गेला होता,आणि लघुशंका करताना काठावर उभे असलेल्या साबळे आजोबांचा तोल जाऊन भल्या मोठया असणाऱ्या आणि खोल पाण्यात पडले, त्यामुळे साबळे चांगलीच घाबरले होते.मात्र सुदैवाने साबळे यांना पोहता येत असल्याने साबळेंनी जीव मुठीत धरून या खणीत पाण्याच्या मध्यभागी असणाऱ्या कारांजाच्या बोटीकडे धाव घेतली,आणि बोटीला पकडून त्यांनी आपला जीव वाचवत मदतीसाठी धावा सुरू केला. रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकांना त्यांनी ओरडून आपला जीव वाचवण्याची विनवणी सुरू केली.मात्र हे अंतर खूपच लांब असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या पर्यंत त्यांची हाक पोहचू शकली नाही,आणि तब्बल अर्ध्या तासाच्या नंतर काही नागरिकांना साबळे पाण्यात अडकल्याचं निदर्शनास आल्या आणि त्यांनी तात्काळ सांगलीच्या पोलिसांना आणि अग्निशमन विभागाला याची कल्पना दिली,आणि या ठिकाणी तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले.आणि त्यांनी पाण्यात अडकलेल्या साबळे यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं,खोल असणाऱ्या खणीला कोणताच कठडा नसल्याने दोरीच्या सहाय्याने उतरून बोटीच्या द्वारे साबळे यांना सुरक्षितपणे पाण्यातून बाहेर काढत सुखरूप सुटका केली आहे.यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी या ठिकाणी केली होती.

बाईट - -हेमंत दबडे - वाहतूक पोलीस ,सांगली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.