सांगली - पलूस तालुक्यातील वसगडे या ठिकाणी गवा आल्याने खळबळ उडाली आहे. एका उसाच्या शेतामध्ये हा गवा ठाण मांडून बसला होता. काही शेतकऱ्यांना गवा बघितल्यावर धावपळ उडाली. काही वेळातच ग्रामस्थांनी या ठिकाणी गर्दी केल्याने गव्याने त्या ठिकाणाहून पळ काढला.
शेतात गव्याचा ठिय्या -
पलूस तालुक्यातील वसगडे येथील खटाव हद्दीवरील महावीर पाटील यांच्या ऊसाच्या शेतात गवा आल्याचा प्रकार घडला आहे. येथील शेतकऱ्यांना हा गवा दिसून आला. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी गावातील काही तरुणांना आणि प्राणी मित्रांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर प्राणीमित्र दीपक परीट यांनी ग्रामस्थांसह या ठिकाणी धाव घेतली. गव्याला शेतातून हुसकावून लावले. दरम्यान वन विभागालाही या गवाच्या बाबतीत माहिती देण्यात आली. सध्या ऊसताेडीचा हंगाम जाेमात सुरु असून ऊसताेड कामगाराबराेबर शेतकर्यांची धांदल सुरू असताना गव्याचे दर्शन झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा - कोरोना काळात आर्थिक घडी विस्कटलेली असताना सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प