सांगली - जिल्ह्यातील कुरळप येथील हनुमान यात्रा हि फटाक्यांच्या अताषबाजीमुळे प्रसिद्ध आहे. हनुमान जयंती या दिवशी पहाटे जन्मकाळ साजरा होतो. तर, सायंकाळी सहा वाजता पालखी सोहळा उत्सहात पार पडतो. यानंतर, संध्याकाळी 10 वाजल्यापासून ते पहाटे पाच वाजेपर्यत नवसाचे औट व शोभेच्या फटाक्याची मोठ्या प्रमाणात आतषबाजी होतं असते. हा उत्सव पाहण्यासाठी जिल्हा व जिल्ह्याबाहेरील लोकं मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटाने गेल्या 350 वर्षाची परंपरा आज खंडित होत आहे.
कुरळप मधील हनुमान देवस्थान हे 350 वर्षापूर्वीचे आहे. असे म्हटले जाते कि, 1902 साली प्लेगची साथ आली होती तेव्हा गावातील सर्व नागरिक हनुमान मंदिरात बसून होते. जे लोक मंदिरात होते ते वाचले तर, जे आले नाही त्यांना त्या रोगाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. तेव्हापासून कुरळपचे हनुमान हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले. आज हि चाळीस गावातील लोक दर शनिवारी दर्शनाला येत असतात.
या मंदिराचा गाभारा छोटा असल्याने आलेल्या भाविकांची गैरसोय होत होती. यासाठी गावातील नागरिकांच्या देणगीतून व पी.आर. पाटील यांच्या प्रयत्नांनी एक कोटी रुपये खर्च करून जिल्ह्यात कुठेही नाही असे टुमदार मंदिर उभारन्यात आले. तर, कित्तेक वर्षांपासून मंदिरात दर शनिवारी मोठी गर्दी होतं असते व श्रावण महिन्यात आठ दिवस पारायण सुरू असते. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती मोठ्या उत्सहात पार पडत असते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पंधरा दिवस झाले मंदिर बंद अवस्थेत आहे. तर, शासनाच्या नियमांचे पालन करत कित्येक वर्षाची परंपरा खंडित करत जन्मकाळ व पहाटे भाविकांचे दंडस्थानही बंद असल्याने नागरिक निरुत्साहिक आहेत.
नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे व मंदिरात कोणीही जाऊ नये. जन्मकाळ व पालखी सोहळा यासारखे कोणताही कार्यक्रम होणार नसल्याचे आवाहन करण्यात आले आहे. असे यात्रा कमिटी अध्यक्ष व राजाराम बापू साखर कारखान्याचे चेअरमन पी.आर. पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.