ETV Bharat / state

विशेष : भय इथलं संपत नाही... वाहनांची नव्हे येथे सुरू आहे बोटींची खरेदी!

सांगली जिल्ह्यात गतवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये महाप्रलयंकारी महापूर आला होता. जवळपास एक वर्ष महापुराला होत आहे. गेल्या वर्षी आलेल्या महापुराने कृष्णा आणि वारणा नदीकाठ जलमय झाला होता. लाखो लोक आपल्या घरात पुराच्या पाण्यात अडकून होते. अनेक गावांना पुराचा विळखा होता.

boat
बोटी खरेदीसाठी लगबग...
author img

By

Published : Jun 24, 2020, 4:24 PM IST

सांगली - पावसाळा सुरू झाला आहे, आणि संभाव्य पुराच्या धास्तीने सांगली जिल्ह्यात सध्या बोटींची खरेदीचा जोर वाढला आहे. विशेष म्हणजे यंदा खासगी आणि गावपातळीवरून या बोटींना मागणी वाढल्याने बोटींच्या दरातही १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे बोट निर्मिती करणाऱ्या कारखान्यांमध्ये बोटींच्या निर्मितीची लगबग सुरू आहे.

सांगली जिल्ह्यात गतवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये महाप्रलयंकारी महापूर आला होता. जवळपास एक वर्ष महापुराला होत आहे. गेल्या वर्षी आलेल्या महापुराने कृष्णा आणि वारणा नदीकाठ जलमय झाला होता. लाखो लोक आपल्या घरात पुराच्या पाण्यात अडकून होते. अनेक गावांना पुराचा विळखा होता. त्यामुळे याठिकाणी बचावकार्य आणि मदत पोहचवण्यासाठी एकच साधन होते, ते म्हणजे 'बोट'.

लाखो नागरिकांना या बोटीमुळे जीवदान मिळाले होते, तर केवळ बोटीअभावी ब्रह्मणाळ येथील १७ जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. त्यामुळे पुरता 'बोट' हीच जीवदान ठरणारे साधन असल्याचे सिद्ध झाले होते. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. प्रशासनाचीही संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू आहे, आणि पुन्हा महापूर येणार का ? असा प्रश्न सध्या सांगलीकरांच्या मनात निर्माण झाला आहे. पण निसर्गाचा काय भरोसा, त्यामुळे जिल्ह्यातला वारणा आणि कृष्णाकाठ हा महापुराच्या धास्तीने भयभीत झाला आहे.

बोटी खरेदीसाठी लगबग...

कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या १०४ गावात पुराचा धोका आहे. त्यामुळे याठिकाणी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. गतवर्षीच्या पूर परिस्थितीत बोटींची कमतरता यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. संभाव्य पूर धोका लक्षात घेऊन बोटींच्या खरेदीचा कल वाढला आहे. पूर आल्यास केवळ बोटीचे जीवदान देऊ शकतात. यामुळे प्रशासनाच्या पातळीवर बोट खरेदी सुरू आहे. तसेच सामाजिक संघटना आणि वैयक्तिक स्वरूपातसुद्धा बोट खरेदीची मागणी वाढली आहे.

या गावात आहेत बोट निर्मितीचे कारखाने -

सांगली जिल्ह्यातील कृष्णाकाठी असणाऱ्या सांगलीवाडी या गावात बोट निर्मितीचे कारखाने आहेत. ६ कारखान्यांच्या माध्यमातून बोटींची निर्मिती होते. पुराच्या धर्तीवर कारखान्यात बोट निर्मिती आणि जुन्या बोटींची दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लाकडी, फायबर, स्पोर्ट्स बोटी याठिकाणी बनवल्या जात आहेत. लॉकडाऊनमुळे बोट व्यावसायाला फटका बसला होता, मात्र संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर या व्यवसायाला आधार मिळाला आहे.

गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत बोट खरेदीची मागणी वाढली आहे. सांगलीवाडी येथील प्रताप जामदार व विष्णू जामदार हे बंधूं बोट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे गोवा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातून बोटींची मागणी असते. यंदाही ही मागणी आहे, पण यामध्ये आता सामाजिक संघटना आणि वयक्तिक पातळीवरही मागणी वाढली आहे. २ सीटपासून ३५ प्रवासी क्षमता असणाऱ्या बोटी बनवल्या जात आहेत. महाराष्ट्र मॅट्रिक टाईम बोर्डाकडून या बोटींची रचना, आकार, वजन ठरवले जाते. जामदार बंधूंप्रमाणे अनेक जण हे बोटींची निर्मिती करत आहेत. तर पुराच्या धर्तीवर सांगली जिल्ह्यात आता वयक्तिक पातळीवर मोठ्या प्रमाणात मागणी आल्याचे जामदार बंधूंनी सांगितले आहे.

५ हजारांपासून ते ५ लाखांपर्यंत बोटींची किंमत

गेल्या वर्षी अनेकांनी बाहेर पडण्यासाठी बोटी उपलब्ध होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे आता त्यांनी आपल्या पातळीवर बोटींची उपलब्धता करून घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या सांगली शहरातून १५ जणांनी बोटींची ऑर्डर जामदार बंधूंकडे दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने ४ प्रवासी क्षमतेच्या बोटींना मागणी आहे, जेणेकरून पुराच्या काळात गल्ली-बोळात या बोटींच्या माध्यमातून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणे शक्य होते. तर लॉकडाऊनमुळे बोट निर्मितीसाठी लागणाऱ्या सागवान, लाकूड, फायबर, केमिकल, हस्ती पाईप, कलर, स्टील या सर्व साहित्यांच्या दरामध्ये वाढ झाल्याने याचा परिणाम बोटींच्या दरामध्ये झाला आहे. त्यामुळे १५ टक्‍क्‍यांनी बोटींच्या दरामध्ये वाढ झाली आहे. ५० हजारपासून ५ लाखांपर्यंत याची किंमत आहे. एकूणच पूरपरिस्थितीशी सामना करायचा झाला, तर केवळ बोट हेच पर्याय असू शकतात हे अधोरेखित आहे. त्यामुळे एका बाजूला पुराची धास्ती आणि या दृष्टीतून तोंड देण्यासाठी बोटींची निर्मिती सुरू आहे. त्यामुळे 'भय इथले, संपत नाही' अशी स्थिती निर्माण झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.