सांगली - विद्युत कायदा रद्द करा, यासह विविध मागण्यांसाठी विद्युत कर्मचाऱ्यांनी सांगलीमध्ये आंदोलन केले आहे. 26 नोव्हेंबरला केंद्राच्या शेतकरी आणि कामगार कायदा विरोधात देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर वीज कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र वर्कर्स फेडरेशनच्या वतीने द्वार सभा घेत निदर्शने करत संपामध्ये सहभाग होण्याबाबत जागृती करण्यात आली आहे.
विद्युत कर्मचाऱ्यांचे निदर्शने
केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आले आहेत. सरकारचे कामगार आणि शेतकरी कायदे हे अन्यायकारक असल्याचा आरोप करत हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी देशातील विविध शेतकरी आणि कामगार संघटनांनी एकत्र येऊन 26 नोव्हेंबरला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये बुधवारी (दि. 25 नोव्हेंबर) महाराष्ट्र वर्कर्स फेडरेशन या वीज कर्मचारी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. गुरुवारच्या संपाला पाठिंबा दर्शवत या संपात सहभागी होण्यासाठी जागृती करण्यासाठी शहरातील वीज वितरण कार्यलयाच्या समोर द्वार सभा घेण्यात आली. तसेच यावेळी केंद्राच्या कामगार धोरणा विरोधात निदर्शनेही करण्यात आली. केंद्राचे धोरण हे सार्वजनिक क्षेत्राला खासगीकरण करण्याचा उद्योग असून यामुळे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कामगारांवर हा अन्याय असल्याचा आरोप, यावेळी करण्यात आला आहे.
हेही वाचा - सांगली: वाळू तस्करी रोखणाऱ्या महिला तहसीलदारांवर माफियाचा जीवघेणा हल्ला; दोघांना अटक