सांगली - एकाच दिवसात सांगली जिल्ह्यात तब्बल ८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. एक कोरोना बाधित वृद्धाचा मृत्यू झाला आहे. कडेगाव येथील भिकवडी येथे मुंबईवरून हा वृद्ध आला होता. गुरुवारी ८ नवे कोरोना रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या ही ३० वर पोहोचली आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती आता चिंताजनक बनत चालली आहे. गुरुवारी सांगली जिल्ह्यात एकाच दिवसात आठ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर यापैकी काही रुग्ण मुंबई,दिल्लीवरून आलेल्या कोरोनाबाधित संपर्कातील आहेत. तर काही मुंबईवरून आलेले आहेत. तर यापैकी एका कोरोनाबाधित वृद्धाचा मृत्यू झाला आहे. कडेगाव तालुक्यातील भिकवडी येथील ६५ वर्षीय हा कोरोनाबाधित वृद्ध आहे. त्यांना मधुमेह, अतिरक्तदाबाचा विकार होता.
शिराळा तालुक्यातील मोहरे येथील एक५० वर्षे पुरुष कोरोनाबाधित आढळला आहे. तसेच मुंबईहून आलेल्या कोरोनाबाधित महिलेचा नातेवाईक २० वर्षीय पुरुष कोरोनाबाधित ठरला आहे.
आटपाडी तालुक्यातील चार व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या आहेत. यापैकी सोनारसिद्ध नगर येथील दोन बहिणी कोरोनाबाधित ठरल्या आहेत. यापैकी एकीचे वय २२ वर्ष व एकीचे वय २६ वर्षे आहे. तर पिंपरी खुर्द येथील एक रुग्ण २६ वर्षीय पुरुष ,तर दुसरा आटपाडी येथील २७ पुरुष कोरोना बाधीत ठरला आहे आहे.
तसेच जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील एक ३२ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित ठरली आहे.
या सर्व ठिकाणी प्रशासनाकडून कंटेनमेंट झोन करून तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ही करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
चिंताजनक.. सांगलीत एका दिवसात आठ नव्या कोरोनाबाधितांची भर, जिल्ह्याचा आकडा ३० वर - सांगली कोरोना पॉझिटिव्ह संख्या
सांगली जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती आता चिंताजनक बनत चालली आहे. गुरुवारी सांगली जिल्ह्यात एकाच दिवसात आठ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ३० वर पोहचला आहे.तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ झाली आहे.