सांगली - आष्टा नजीकच्या इस्लामपूर मार्गावर एका ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ट्रक चालक आणि क्लिनर दोघेही जागीच ठार झाले, तर लक्ष्मण मारुती औताडे ( वय 50 माळेवाडी, ता.आटपाडी, सांगली) व क्लिनर सचिन भानुदास घाडगे (वय 38 रा. येरमकरवाडी, ता. मेढा, जि. सातारा) असे मृतांची नावे आहेत.
हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चारही चाके निखळली. आष्टा नजीकच्या शिंदेंमळा येथे सांगलीहून इस्लामपूरच्या दिशेने निघालेल्या ट्रकची ट्रक्टराच्या पाठीमागील ट्रॉलीला जोरदार धडक बसली आणि या धडकेत ट्रक रस्त्याच्या बाजुच्या शेतामध्ये जाऊन घुसला. ज्यामध्ये ट्रकच्या केबीनमध्ये अडकून छातीला व डोक्याला मार लागला. यात चालक व क्लिनर हे जागीच ठार झाले. या अपघातात दोन्ही वाहनाचे मोठे नकुसान झाले असून याबाबत आष्टा पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.