सांगली : महाराष्ट्रात सध्या ग्रामपंचायत निवडणूकींची धुमाळी सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. अशातच मतदारांना आमिष दाखवण्यासाठी सांगली जिल्ह्यात नरवाड ( Gram Panchayat elections at Narwad ) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मतदारांना उमेदवारांकडून आमिष : मतदानाच्या पूर्वसंध्येला सांगलीच्या मिरज तालुक्यामध्ये साड्या आणि पैसे वाटप करण्यात आल्याच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आचारसंहिता भरारी पथकाला याची माहिती मिळाल्यानंतर पथकाकडून नरवाड गावामध्ये दाखल होऊन रस्त्यावर साड्या आणि पैशांच्या नोटा आढळून आले आहेत. पथकाकडून या साड्या आणि पाचशे रुपयांच्या दोन नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त : अत्यंत चुरशीने नरवाडे ग्रामपंचायतची निवडणूक ( Gram Panchayat elections at Narwad ) पार पडत आहे. आणि या निवडणुकीमध्ये मतदानासाठी मतदारांना आमिष म्हणून साड्या आणि पैसे वाटप सुरू असल्याची माहिती मिळाली. भरारी पथक गावात दाखल झाल्यानंतर, रस्त्यावर साड्या आणि साड्यांच्या आत लपवलेले पाचशे रुपयेच्या नोटा फेकून दिले आहेत. या साड्यांच्या पॅकेट सोबत प्रचार पत्रके ही आढळून आले आहेत आणि हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. उद्या रविवारी ग्रामपंचायतीसाठी मतदान पडणार असताना आदल्या दिवशी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे गावामध्ये खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर गावाता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.