सांगली - विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपच्या उमेदवारीवरून संघर्षाची चिन्हे निर्माण झाली आहेत. भाजपचे नेते माजी आमदार दिनकर पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारीची मागणी करत त्यांनी भाजपला बंडखोरीचा इशारा दिला आहे. सांगलीत आज पाटील समर्थकांचा मेळावा पार पडला यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा - पंतप्रधान चुकीचं बोलले.. भारताने जगाला बुद्ध दिला पण उपयोगाचा नाही - संभाजी भिडे
सांगली विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये संघर्ष उफाळून येत आहे. विद्यमान भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर भाजपचे नेते व माजी आमदार दिनकर पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली आहे.
हेही वाचा - 'पवार यांच्यावरील ईडी कारवाई म्हणजे बदनामीचा भाजपचा कुटील डाव'
या मेळाव्याच्या निमित्ताने दिनकर पाटील यांनी आपल्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. सांगली विधानसभेबाबत भाजपने उचित निर्णय घ्यावा, अन्यथा वेगळा विचार केला जाईल, असा अल्टीमेटम माजी आमदार दिनकर पाटील यांनी दिला आहे. भाजपने उमेदवारी दिली तर ठीक अन्यथा मी माझ्या सैन्यासोबत असेन, असे सांगत माजी आमदार दिनकर पाटील यांनी पक्षाला बंडखोरीचा इशारा दिला आहे.