सांगली - एफआरपी जाहीर झाल्याशिवाय साखर कारखाने सुरू होवू देणार नाही, अशी भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस तोड व ऊस वाहतुक बंद पाडली आहे. तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे शेतकरी संघटनेने ऊस वाहतुक करणारा एक ट्रक आणि दोन ट्रॅक्टरची तोडफोड केली आहे.
ऊस वाहतूक आणि तोड रोखली
सांगली जिल्ह्यातील ऊसाची एफआरपी अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र ऊसाचा गाळप सुरू झाले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एफआरपी जाहीर झाल्याशिवाय ऊस गाळप होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील मोहनराव शिंदे साखर कारखान्यासाठी सुरू असलेली ऊस वाहतूक बंद पाडली आहे. तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि ट्रॉलीची तोडफोड करून चाकांची हवा सोडली आहे. एफआरपी जाहीर झाल्याशिवाय ऊस कारखाने सुरू देणार नाही, अशी भूमिका घेत ऊस आंदोलन सुरू केले आहे.
हेही वाचा - नारिंगी नदीकिनारी मानवी शरीराचे अवयव व रक्ताचा सडा, घातपाताचा संशय