ETV Bharat / state

Ahilya Devi Holkar Memorial : फ्लावर समझे क्या फायर है हम! सलगर यांची पडळकरांवर टीका - Dedication of the memorial of Ahilya Devi Holkar

देशात ज्या कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या, त्या यादीत अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अग्रभागी असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. (Ahilya Devi Holkar Memorial) ते सांगली येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी युवतीच्या अध्यक्षा सक्षणा सलगर यांनीही भाषण केले. त्या पडळकरांवर टीका करत म्हणाल्या 'फ्लावर समजू नका फायर है हम...

Dedication of the memorial of Ahilya Devi Holkar by Sharad Pawar
अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण
author img

By

Published : Apr 3, 2022, 7:43 AM IST

सांगली - स्त्री असली म्हणून त्यांना काही कमी समजण्याची आवश्यकता नाही. त्या सुद्धा राज्य करू शकतात याचे उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या आहेत असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. देशात ज्या कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या, त्या यादीत अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अग्रभागी असल्याचही ते म्हणाले आहेत. (Dedication Memorial of Ahilya Devi Holkar) ते सांगली येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

राष्ट्रवादी युवतीच्या अध्यक्षा सक्षणा सलगर

नागपुरच्या तंबूत बांधून ठेवू - या कार्यक्रमात राष्ट्रवादी युवतीच्या अध्यक्षा सक्षणा सलगर यांनीही भाषण केले. त्यावेळी त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर घणाघाती टीका केली. अगदी फडणवीसांना, अहिल्यादेवींनी पेशवाईला दिलेल्या इशाऱ्याची आठवण करून देत नागपुरच्या तंबूत बांधून ठेवू अशी घाणाघाती टीका केली. तर पडळकरांना देखील स्वत:ला हीरो समजू नका, असे म्हणत हमारे अंगण मै तुम्हारा क्या काम हैं असा डायलॉग मारला.

अहिल्यादेवींचे कार्य प्रेरणादायी - देशात ज्या कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या, त्या यादीत अहिल्यादेवी होळकर यांचा समावेश आहे. फुले-शाहू -आंबेडकर, जिजामाता-अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले यांनी समाजाला दिशा दिली. यामधून दिसते हेच की एक स्त्री सुद्धा चांगले राज्य चालवू शकते असही ते म्हणाले. या सर्वातून आहिल्यादेवींच्या कार्याची प्रेरणा मिळते. असही पवार यावेळी म्हणाले आहेत.

भव्यदिव्य असा स्मारकाचा लोकार्पण सोहळा - आहिल्यादेवींच्या स्मारकचे शरद पवारांच्या हस्ते होणाऱ्या लोकार्पणाला भाजपाने विरोध दर्शवत, 27 मार्च रोजी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आणि भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. तसेच, ड्रोनद्वारे स्मारकाचे उदघाटन घेण्यात आल्याचे पडळकर यांनी जाहीर केले होत. मात्र, नियोजनानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये भव्यदिव्य असा स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडला.

तर याद राखा फडणवीस - भाजपला कशाला हवाय? पडळकर यांच्या जोडीला खट्याळ बैल. त्यांना निवडून येता येत नाही, मतदार संघ नाहीत, जर मतदार संघ असते तर भाजपाने इथून बारामतीला कशाला पाठवले? तुमची कर्मभुमीत लढा आम्हाला वाईट वाटणार नाही. जर, फडणवीसांनी धनगर समाजाच्या लोकांना हत्यार म्हणून वापरले तर फडणवीस, ज्या पेशव्यांना आमच्या अहिल्यादेवींना सांगितले होते, राघोबा जरा शिस्तीत राहा, आज जर विधवा आहे, म्हणून चाल कराल तर इतिहास तुम्हाला बघुन घेईल असही त्या म्हणाल्या आहेत.

शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण - सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेच्या माध्यमातून विजय नगर या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाचा लोकार्पण सोहळा शनिवारी (दि. 2 एप्रिल)रोजी आयोजीत करण्यात आला होता. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री विश्वजित कदम, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार सुमनताई पाटील महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - 2019च्या विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला', राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.