सांगली - संत गाडगेमहाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या विचारांप्रमाणे भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्या पाणी हा उपक्रम सांगलीत राबवण्यात आला. सुमारे ८०० जणांना यावेळी झुणका-भाकरी आणि पाण्याचे वाटप करण्यात.
सांगलीतील परीट समाज बांधवांच्यावतीने संत गाडगेबाबांची ६३ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने गाडगेबाबांच्या विचारानुसार 'भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्या पाणी' देण्याचा उपक्रम राबवण्यात आला. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर यावेळी परिट समाज बांधवांच्याकडून झुणका-भाकरी आणि पाण्याचा मोफत वाटप करण्यात आले. सुमारे ८०० नागरिकांना यावेळी याचे वाटप करण्यात आले. संत गाडगेबाबा महाराजांचे विचार सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
हेही वाचा - शेतकरी कर्जमाफीची घोषणा लांबणीवर? जाणून घ्या 'काय' म्हणाले नवाब मलिक...