ETV Bharat / state

सांगली : खड्ड्यांच्या दुरवस्थेवरून दलित महासंघाने घातली मृत्युंजय महापूजा - सांगली खराब रस्ते बातमी

शहरातील खराब रस्त्यामुळे सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या निषेधार्थ दलित महासंघाने मृत्यूंजय महापूजा केली.

महापूजा करताना
महापूजा करताना
author img

By

Published : Sep 22, 2020, 8:42 PM IST

सांगली - सांगली महापालिका क्षेत्रातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांचे मृत्युंजय महापूजा करून पाालिका प्रशासनाच्या कारभाराचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

मृत्युंजय महापूजा घालताना
सांगली महापालिका क्षेत्रातल्या अनेक रस्त्यांना सध्या चाळणी रुप आले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणीच्या रस्त्यामध्ये खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. इतकेच नव्हे तर सांगली महापालिका क्षेत्रात वाढत्या कोरोनाग्रस्तांची संख्या व त्या रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेचा मोठ्या प्रमाणात वावर संपूर्ण शहरात सुरू आहे. या खड्ड्यांचा फटका त्या कोरोना रुग्णांनाही बसत आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यातील खड्ड्यांची डागडुजी करावी आणि रस्ते दुरुस्त करावे, या मागणीसाठी सांगलीमध्ये दलित महासंघाच्यावतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे.

दलित महासंघाचे शहर अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सांगली-मिरज रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मृत्युंजय महापूजा करण्यात आली. सांगली महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी आणि पालिका प्रशासनाच्या कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.

हेही वाचा - "ढोल बजाओ, सरकार जगाओ", धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांची आंदोलनाची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.