सांगली - जिल्ह्यामध्ये नाईट कर्फ्यु बरोबर रात्री आठ ते सकाळी 7 पर्यंत जमावबंदीचा आदेशही जिल्हा प्रशासनाकडून लागू करण्यात आलेला आहे. या धर्तीवर सांगली शहर पोलिसांनी शहरात पथ संचलन करत नागरिकांना जमावबंदी आदेशाचे पालन करावे, अन्यथा करवाई करण्यात येईल ,असा इशारा दिला आहे.
सांगलीत नाईट कर्फ्यूसोबत जमावबंदीही; आदेश पाळा, अन्यथा कारवाई - पोलिसांचा इशारा
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रविवारी पासून नाईट कर्फ्यू लागू केला आहे, तर सांगली जिल्हा प्रशासनाकडून रात्री 8 ते सकाळी 7 वाजे पर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहेत.
night curfew in Sangli
सांगली - जिल्ह्यामध्ये नाईट कर्फ्यु बरोबर रात्री आठ ते सकाळी 7 पर्यंत जमावबंदीचा आदेशही जिल्हा प्रशासनाकडून लागू करण्यात आलेला आहे. या धर्तीवर सांगली शहर पोलिसांनी शहरात पथ संचलन करत नागरिकांना जमावबंदी आदेशाचे पालन करावे, अन्यथा करवाई करण्यात येईल ,असा इशारा दिला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रविवारी पासून नाईट कर्फ्यू लागू केला आहे, तर सांगली जिल्हा प्रशासनाकडून रात्री 8 ते सकाळी 7 वाजे पर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहेत. त्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स , मॉल अशा गर्दीच्या ठिकाणी केवळ पाच लोकांना 11 वाजेपर्यंत 5 व्यक्तींसाठी परवानगी असणार आहे. ज्या ठिकाणी आदेशाचा भंग होईल, त्या ठिकाणी पोलिसांच्याकडून कारवाई करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने सांगली पोलिस दल सज्ज झालेला आहे. यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकेबंदी आणि पेट्रोलिंग करण्यात येत आहे.
बाजारपेठेत रुटमार्च करत इशारा -
रविवारी साजरी होत असलेली होळी ,मुस्लिम धार्मियांची बडी रात अशा पार्श्वभूमीवर सांगली शहर पोलिसांकडून शहरात पथ संचलन करण्यात आले. कापडपेठ, हरभट रोड, बदाम चौक, भाजी मंडई, मारूती रोड अशा बाजार पेठेतील प्रमुख मार्गावरून पोलिसांनी रूटमार्च करत व्यापारी आणि नागरिकांना आदेशाची कडक अंमलबजावणी करावी अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Last Updated : Mar 28, 2021, 8:56 PM IST