सांगली : पलूस तालुक्यातल्या भिलवडी येथील साठेनगरमध्ये राहणाऱ्या अक्षय मोरे यांच्य बैलाचा पाठलाग मगरींनी कृष्णा नदीत केल्याची घटना घडली आहे. यात मालकांने मित्रांच्या सह्याने बैलाला पाण्याबाहेर काढले आहे. या बाबत महिती अशी की, अक्षय मोरे बैलप्रेमी आहे. आटपाडी इथल्या जनावराच्या बाजारामधून गुरुवारी अक्षय मोरे याने खिलार जातीचा एक जातीवंत बैल तब्बल 70 हजार रुपये देऊन खरेदी केला. तो बैल घेऊन ते गावी आले. बैल अगदी निवांतपणे गावात पोहोचला देखील, मात्र या बैलाला टेम्पोमधून उतरवत असताना अचानकपणे टेम्पोचासह इतर गाड्यांचा हॉर्न वाजला. त्यामुळे नवीन ठिकाण, गाड्यांचा आलेला आवाज यामुळे बैल अस्वस्थ होऊन सैराभैरा झाला. बैलाला आवरण्या आधीच बैलाने गाडीतून थेट उडी मारून धूम ठोकली.
मगरींनी बैलाचा पाठलाग केला : बैल तो थेट कृष्णा नदीच्या तीरावर जाऊन पोहोचला. त्याच्या मागे अक्षय आणि त्याचे इतर मित्र देखील पोहोचले. या बैलाला नदीमध्ये जाण्यापासून रोखू लागले. बैलाला पकडण्यासाठी दोरीचा फास ही टाकण्यात आला. मात्र त्याच्यामध्ये तो न अडकता थेट पाण्यामध्ये पडला. कृष्णच्या पाण्यात पडताच त्या बैलाला पाण्याचा मोह आवरता आला नाही. बैलाने पाण्यातच राहणं पसंत केले. मग अक्षय आणि त्याचे मित्र जसे जसे पुढे जाऊ लागले, तसा तसा हा बैल पाण्यातून पुढे पुढे सरकू लागला. बैल ही पाण्यात उतरल्याचे कृष्णा नदीतल्या मगरांच्याही निदर्शनास आले होते. मग मगरीही या बैलाच्या आजूबाजूने घात लावून बसल्या. बैलांच्या दिशेने या मगरींनी बैलाचा पाठलाग सुरू केला.
मगरीच्या तावडीतून बैलाची सुटका : बैल जसा जसा पुढे जाऊ लागला, तसे मगरी देखील या बैलाच्या मागे जाऊ लागल्या. बैलालाही मगरी आपल्या दिशेने येत असल्याचे चाहूल लागली. यानंतर बैलाने या मगरींना चकवा देण्याचे प्रयत्न सुरू केला. पाण्यामध्ये मगर आणि बैल यांच्यात पाठशिवनीचा खेळ सुरू झाला. बैलाला मगरीच्या भक्षीसस्थानी जावे लागणार याची भीती सगळ्यांनाच लागली होती. पण अक्षय आणि त्याच्या इतर नावाडी चालक मित्रांनी नावेतून पाण्यात उतरत बैलाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण नाव पाण्यात उतरल्यावर बैल आणखी पुढे जाऊ लागला. कृष्णा नदीच्या एका तीरावरून दुसऱ्या तीराकडे त्याचा प्रवास सुरू झाला. तसा मगरींचाही बैलाच्या मागचा पाठलाग सुरूच होता. पाण्यामध्ये नावाडी, बैल, मगर असा थरारक खेळ सुरू झाला होता. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर दुसऱ्या बाजूला पोहोचलेल्या बैलाला अक्षय, धाडसी नावाडी चालकांनी बाहेर काढून मगरीच्या तावडीतून या बैलाची सुटका केली. तब्बल चार तास कृष्णेच्या भिलवडीच्या नदीपात्रामध्ये बैल आणि मगरींचा हा पाठ शिवणीचा थरारक खेळ सुरू होता, त्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता.
हेही वाचा - Sanjay Raut : तुम्ही तुमची कारस्थाने थांबवा आम्ही तुमच्यावरील हल्ले थांबवतो - संजय राऊत