ETV Bharat / state

CPI Leader Brinda Karat : 'ईडी, सीबीआय भ्रष्टाचाराविरोधी नव्हे, तर मोदींना बळकट करणारी अस्त्र- वृंदा करात - वृंदा करात यांची मोदी सरकारवर टीका

CPI Leader Brinda Karat : ईडी, सीबीआय ही भ्रष्टाचाराच्या विरोधात अस्त्र नसून मोदी सरकारशी लोक जोडणारे अस्त्र बनले आहे, असा आरोप ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या व खासदार वृंदा करात यांनी केला आहे. भाजपात आल्यास तो मोदी- शहाच्या वॉशिंग पावडरने निरमा पेक्षा स्वच्छ होतो, अशी टीका करत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या देणगीतून राज्य- राज्यातले सरकार पाडण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोपही वृंदा करात यांनी केले.

कॉम्रेड वृंदा करात
कॉम्रेड वृंदा करात
author img

By

Published : Aug 7, 2022, 1:00 PM IST

सांगली - ईडी, सीबीआय ही भ्रष्टाचाराच्या विरोधात अस्त्र नसून मोदी सरकारशी लोक जोडणारे अस्त्र बनले आहे, असा आरोप ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या व खासदार वृंदा करात यांनी केला आहे. तसेच विरोधात असेल तर भ्रष्टाचारी, आणि भाजपात आल्यास तो मोदी- शहाच्या वॉशिंग पावडरने निरमा पेक्षा स्वच्छ होतो, अशी टीका करत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या देणगीतून राज्य- राज्यातले सरकार पाडण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोपही खासदार कॉम्रेड वृंदा करात यांनी केला आहे. ते विटा येथे बोलत होते.

कॉम्रेड वृंदा करात

अमित शहा यांच्यावर सडकून टीका - विटा येथे क्रांतीसिंह नाना पाटील पुरस्काराने ज्येष्ठ कम्युनिस्टनेत्या राज्यसभा खासदार आणि कॉम्रेड वृंदा करात यांना सन्मानित करण्यात आलं होतं. या निमित्ताने बोलताना वृंदाकरा त्यांनी भाजपा सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे. कॉम्रेड करात म्हणाल्या, ईडी, सीबीआय, आयटी या संस्था आता भ्रष्टाचार विरोधातील अस्त्र नाहीत, पण त्या मोदी सरकारच्या जवळ आणखी माणसं आणण्याचे अस्त्र बनली आहेत.

भाजपात आल्यास दुधासारखे - सरकारी आकड्यानुसार 3 हजार 700 केसेस मनीलॉड्रिंग अंतर्गत झाली आहेत. पण 5 वर्षात केवळ 23 जण दोषी आढळले आहेत. केवळ आणि केवळ मोदी सरकारला मजबूत करण्यासाठी आणि विरोधकांना धमकी देण्यासाठी एक घोषवाक्य बनले आहे, जर तुम्ही विरोधात असाल तर भ्रष्टाचारी आणि भाजपात आल्यास दुधासारखे आहे. आणि मोदी आणि अमित शहा यांच्या वॉशिंग पावडरने तुम्ही निरमापेक्षा ही स्वच्छ झाला आहात.

लाखो कामगार उपाशी मरत आहेत - दिल्लीत बसून राष्ट्रवाद शिकवणाऱ्यांनी आतातरी आत्मपरीक्षण करावे. आपल्या देशात धर्मवाद हा राष्ट्रवाद कधीच असू शकत नाही. धर्मावर आधारीत नागरिकत्त्व ही संकल्पना या देशात असू शकत नाही. आमचे नागरिकत्व धर्माशी नव्हे, तर घटनेशी बांधील आहे. मात्र, भाजप सत्ता मिळवण्यासाठी हिंदुत्त्वाचा हत्यारासारखा वापर करत आहे. देशात लाखो कामगार उपाशी मरत आहेत. देशातील काही मोजके उद्योगपती साधनसंपत्तीची लूट करत आहेत. त्यावेळी तुमचा धर्म कुठे असतो. देशातील शंभर अतिश्रीमंत लोकांची संपत्ती ही 55 करोड जनतेच्या संपत्तीपेक्षा जास्त आहे. जेव्हा लोक कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये जगण्यासाठी संघर्ष करत होते. तेव्हा देशातील श्रीमंतांची 23 हजार लाख करोडवरून 57 हजार लाख करोडवर गेली. इतकी असमानता देशात वाढत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणतात, महागाईचा प्रश्नच देशात नाही, अशी टीकाही यांनी केली आहे.

खासदार वृंदा करात यांचा टोला - क्रांतिसिंह नाना पाटील हे दोन वेळा सामान्य लोकांमधून खासदार झाले. मात्र आज देशातील ८० टक्के खासदार हे कोटयधीश आहेत. सर्वसामान्य माणूस संसदेत जाईल काय ?याचा विचार करण्याची वेळ आली आहे. सुमारे ४ हजार ७०० कोटी रुपयांची देणगी एकट्या भाजपला मिळाली. अशा देणग्यांचा उपयोग देशातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यासाठी भाजप करत आहे. महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारमधील आमदार सुरत, गुवाहटीच्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये योगा करत होते, असा टोलाही खासदार वृंदा करात यांनी लगावला आहे.

हेही वाचा - Bawankule criticized Ajit Pawar - शिंदे, फडणवीस विकास कामांसाठी दिल्लीला जातात, अजित पवारांनीही यायचे असल्यास सांगावे - बावनकुळे

हेही वाचा - surrogate case : सरोगेटच्या आठकाठीनंतर कोर्टाकडून पालकांना दिलासा, मुलाला ऑस्ट्रेलियातील नेण्याचा मार्ग मोकळा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.