सांगली - जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. जिल्ह्यातील जत तालुक्यातील गुडापूर येथील श्री दान्नमादेवी मंदिर उद्यापासून दर्शनासाठी ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहे. देवाचे सर्व पूजा विधी मात्र सुरू राहतील. देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे. भाविकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.
जत तालुक्यातील गुड्डापूर येथील जागृत देवस्थान मानण्यात येत असलेले दान्नमादेवी देवस्थान मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय आतापर्यंत पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. हे कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रकाश गणी व विश्वस्त चंद्रशेखर गोब्बी यांनी सांगितले.
हेही वाचा - 'कोरोना' प्रभाव : 27 वर्षात पहिल्यांदाच मुंबईतील 'फॅशन स्ट्रीट' होणार बंद !
हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाकण खेड बाजार समिती बंद