सांगली - जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी गेला आहे. आटपाडीच्या झरे येथील एका ५८ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मिरजेच्या कोरोना रुग्णालयात त्या महिलेवर उपचार सुरू होते. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १४३ झाली आहे.आतापर्यंत ८१ जण हे कोरोनामुक्त झाले असून सध्या ५७ कोरोना रुग्ण हे उपचार घेत आहेत.
मिरज कोरोना रुग्णालयात उपचार घेत असताना ५८ वर्षीय महिलेचा शनिवारी मध्यरात्री २ वाजता मृत्यू झाला.ही महिला मूळची आटपाडी तालुक्यातील झरे येथील आहे. मात्र,ती कुटुंबासह मुंबईतील कुर्ला येथे राहत होती.आठ दिवसांपूर्वी ती आपल्या कुटुंबासह झरे याठिकाणी आली होती. त्यानंतर या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने तिला मिरजेच्या कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता. या महिलेस थॉयराईड बी आणि दम्याचा त्रास होता.
महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाकडून महिलेच्या संपर्कातील मुलगा,सून आणि नातवाला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करत त्यांची स्वॅब टेस्ट घेतली. महिलेच्या सून ,मुलगा यांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले होते. ५ वर्षीय मुलाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता.त्यानंतर झरे गाव सील करत जंतुनाशक फवारणी करण्यात आली होती.मात्र, महिलेच्या मृत्यूमुळे झरे गावात खळबळ उडाली आहे.