ETV Bharat / state

Sangli Murder Case अपहरण झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचा खून करून मृतदेह फेकला नदीपात्रात - बांधकाम व्यावसायिकाचा खून करून मृतदेह फेकला नदीपात्रात

बांधकाम व्यावसायिकाचा खून Murder of Construction Professional Sangli झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माणिकराव पाटील यांचा मृतदेह कवठेपिरान येथील वारणा नदीच्या पात्रामध्ये आढळून आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. चार दिवसांपूर्वी माणिकराव पाटील यांचे तुंग येथून अपहरण झाल्याचा प्रकार घडला होता आणि आता त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.

बांधकाम व्यावसायिक
बांधकाम व्यावसायिक
author img

By

Published : Aug 17, 2022, 8:07 PM IST

सांगली - जमीन दाखवण्याच्या बहाण्याने अपहरण झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचा खून Murder of construction Professional Sangli झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माणिकराव पाटील यांचा मृतदेह कवठेपिरान येथील वारणा नदीच्या पात्रामध्ये आढळून आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. चार दिवसांपूर्वी माणिकराव पाटील यांचे तुंग येथून अपहरण झाल्याचा प्रकार घडला होता आणि आता त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. मात्र अपहरण आणि खून कोणत्या कारणातून झाला याचा तपास पोलीस करत आहेत.

सांगली शहरातील बांधकाम व्यावसायिक माणिकराव विठ्ठल पाटील, वय 54 यांचे 13 ऑगस्ट रोजी गाडीसह अपहरण करण्यात आले होते. जमीन दाखवण्याच्या बहाण्याने बोलवून तुंग येथून पाटील यांचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात पाटील यांचे सुपुत्र विक्रमसिंह पाटील यांनी अपहरणाची फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. जयसिंगपूर या ठिकाणी त्यांची गाडी देखील आढळून आली होती. मात्र पाटील यांचा शोध कोठेच लागला नव्हता आणि आज बुधवारी सकाळी माणिक पाटील यांचा मृतदेह कवठेपिरान येथील वारणा नदीपात्रामध्ये आढळून आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून साधारणतः तीन दिवसांपूर्वीच पाटील यांचा खून करून त्यांचा मृतदेह वारणा नदीपात्रामध्ये फेकून दिल्याचा प्राथमिक तपासात निष्पन्न झालेला आहे. आता खून आणि अपहरण कोणत्या कारणातून ? व कोणी केला ? त्याचा शोध पोलिसांच्याकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा - Fight BJP NCP Workers Thane भाजपा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत जीममध्ये हाणामारी, घटना सीसीटीव्हीत कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.