जत (सांगली) : जत शहरातील विठ्ठलनगर येथील एका बांधकाम मजुराने आज (गुरुवार) गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कौटुंबिक नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवनाथ तुळशीराम सकपाळ (28) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे.
हेही वाचा... लॉकडाऊनमध्ये गमावली नोकरी, तरुणींनी स्विकारला देह विक्रीचा पर्याय
जत शहरातील विठ्ठलनगर येथील रहिवासी नवनाथ तुळशीराम सकपाळ याने आज सकाळी जतमधील कृषी विभागाच्या मागील बाजूस झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही जागा सकपाळ याच्या घरापासून थोड्याच अंतरावर आहे. नवनाथ सकाळी 5 च्या सुमारास घरातून बाहेर गेला होता. त्यानंतर त्याने कृषी विभागातील आवारात गळफास घेतला असल्याचे येथील नागरिकांनी पोलिसांना सांगितले.