ETV Bharat / state

पेट्रोल व डिझेल दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध; पंप आणि वाहनधारकांना गुलाबपुष्प देऊन दरवाढीच्या दिल्या शुभेच्छा

देशातील जनतेने भाजपला एक हाती सत्ता दिली आहे. त्यामुळे सरकारकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, सरकारकडून जनतेच्या माथ्यावर महागाईचा भडीमार करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

सांगली
author img

By

Published : Jul 15, 2019, 12:10 PM IST

सांगली - पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसकडून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. पेट्रोल पंपावर जाऊन वाहनधारकांना गुलाबपुष्प देऊन दरवाढीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पेट्रोल व डिझेल दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध

नुकतेच केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. याचे संतप्त पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. मात्र, सांगली जिल्हा काँग्रेसकडून या दरवाढीच्या नागरिकांना शुभेच्छा देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील काही पेट्रोल पंपावर जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच यावेळी पंपचालकांना गुलाबपुष्प देण्यात आले. त्याचबरोबर वाहनधारकांनाही गुलाबपुष्प देऊन वाढलेल्या पेट्रोल आणि डिझेल दराबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. केंद्रातले सरकार फसवे सरकार असल्याचे गांधीगिरी आंदोलनातून दर्शवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

देशातील जनतेने भाजपला एक हाती सत्ता दिली आहे. त्यामुळे सरकारकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, सरकारकडून जनतेच्या माथ्यावर महागाईचा भडीमार करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. काँग्रेसचे सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AVB

FEED send file Name - mh_sng_02_congress_andolan_vis_1_7203751 - to - mh_sng_02_congress_andolan_byt_3_7203751

स्लग - पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या काँग्रेसकडून गांधीगीरी पद्धतीने निषेध,पंप आणि वाहन धारकांना गुलाब पुष्प देऊन दरवाढीच्या देण्यात आल्या शुभेच्छा...

अँकर - केंद्र सरकारच्या वाढत्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसकडून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे.पेट्रोल पंपावर जाऊन वाहनधारकांना गुलाब पुष्प देऊन दरवाढीच्या शुभेच्छा देण्यात आले आहेत.

Body:व्ही वो - नुकतेच केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे.याचे संतप्त पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत.मात्र सांगली काँग्रेसकडून या दरवाढीचा नागरिकांन शुभेच्छा देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आला आहे.शहरातील काही पेट्रोल पंपावर जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच यावेळी पंप धारकांना गुलाब पुष्प देण्यात आले.त्याचा बरोबर वाहनधारकांनाही गुलाब पुष्प देऊन वाढलेल्या पेट्रोल आणि डिझेल दराबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.व केंद्रातले सरकार फसवे सरकार असल्याचं गांधीगिरी आंदोलनातून दर्शवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला आहे.तसेच देशातील जनतेने भाजपाला एक हाती सत्ता दिली आहे.त्यामुळे सरकारकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत.मात्र सरकारकडून जनतेच्या माथ्यावर महागाईचा भडिमार करण्यात येत असल्याचा आरोप,यावेळी काँग्रेस कडून करण्यात आला आहे.काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील गांधीगिरी पद्धतीचे आंदोलन करण्यात आले,यावेळी आंदोलनात नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.