ETV Bharat / state

दोन बालविवाह प्रकरणी 10 जणांच्यावर गुन्हे दाखल; एकाची वरात थेट पोलीस ठाण्यात... - सांगली बातमी

सांगली जिल्ह्यातील दोन ठिकाणी बालविवाहाच्या घटना समोर आल्या आहेत. मिरज तालुक्यातील बेडग आणि सुभाषनगर याठिकाणी हे बालविवाह झाले होते. कर्नाटक मधील हिजर्गी येथील 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा सुभाष नगर येथील सचिन माळी तरुणाशी लग्न झाले. शुक्रवारी सुभाष नगर येथील घरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी चौकशी केली. चौकशीत मुलगी अल्पवयीन असल्याची बाब समोर आली.

बालविवाह
बालविवाह
author img

By

Published : Jul 16, 2021, 3:15 PM IST

सांगली - मिरज तालुक्यात दोन ठिकाणी बाल विवाहाचे प्रकार घडले आहेत. याप्रकरणी 10 जणांच्या विरोधात मिरज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. तर एक सुरू असलेले लग्न रोखत वराची वरात थेट पोलिस ठाण्यात पोहोचली.

सांगलीत बालविवाह
वरात थेट पोलीस ठाण्यातसांगली जिल्ह्यातील दोन ठिकाणी बालविवाहाच्या घटना समोर आल्या आहेत. मिरज तालुक्यातील बेडग आणि सुभाषनगर याठिकाणी हे बालविवाह झाले होते. बेडग याठिकाणी एका साडे सतरा वर्षाच्या मुलीचा मुलासोबत विवाह सुरू असल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार मिरज ग्रामीण पोलिसांनी बेडग येथे पोहचत विवाह रोखला. आणि पाहुण्यांसह वरात थेट पोलीस ठाण्यात नेली. त्यानंतर मुलीला सज्ञान होण्यासाठी 6 महिन्याचा कालावधी कमी पडत होता. ग्रामीण पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार नवरा मुलगा राहुल प्रकाश आंधळे ,वडील प्रकाश रामू आंधळे आशाताई आंधळे मुलीची आई सारिका सानप ,मुलीचा सासरा विठोबा सानप यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.अल्पवयीन मुलीचा बालविवाह कर्नाटक मधील हिजर्गी येथील 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा सुभाष नगर येथील सचिन माळी तरुणाशी लग्न झाले. शुक्रवारी सुभाष नगर येथील घरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी चौकशी केली. चौकशीत मुलगी अल्पवयीन असल्याची बाब समोर आली. त्यामुळे नवरा मुलगा, आई, आणि मावशी यांच्यासह चार जणांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. सांगली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बाबासाहेब नागरगोजे यांच्या माध्यमातून हे बालविवाहाचे प्रकार समोर आले आहेत.

हेही वाचा - पुण्यातील आयआयएसईआर संस्थेत आगीची घटना; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.