ETV Bharat / state

मंदिरात चप्पल घालून आल्याने 2 गटात राडा; भाजपा आमदार पडळकरांच्या भावासह आयकर सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा दाखल - गोपीचंद पडळकर यांच्या भावावर गुन्हा दाखल न्यूज

मंदिरात चप्पल घालून आल्याने दोन गटात जोरदार राडा झाला. यावेळी 2 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना आटपाडी मधील मासाळवाडी गावामध्ये घडली. या प्रकरणी 12 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावासह मुंबईतील एका आयकर सहाय्यक आयुक्ताचाही समावेश आहे.

clashes between two groups police booked 12 people including mlc gopichand padalkars brother
मंदिरात चप्पल घालून आल्याने 2 गटात राडा; भाजपा आमदार पडळकरांच्यासह भावासह आयकर सहाय्यक आयुक्तवर गुन्हा दाखल
author img

By

Published : Nov 18, 2020, 4:03 PM IST

Updated : Nov 18, 2020, 5:45 PM IST

सांगली - मंदिरात चप्पल घालून आल्याने आटपाडी मधील मासाळवाडी गावामध्ये दोन गटात जोरदार राडा झाला. यावेळी 2 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी 12 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावासह मुंबईतील एका आयकर सहाय्यक आयुक्ताचाही समावेश आहे.

मंदिरात चप्पल घातल्याच्या वादातून झाला तुफान राडा
मासाळवाडी गावामध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास गावातील मंदिरात दिवाळीच्या निमित्ताने कार्यक्रम होता. यासाठी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर हे आपल्या कार्यकर्त्यांसाठी आले होते. यावेळी त्यांच्या पैकी काही जण हे मंदिरात चप्पल घालून आल्याने मंदिराच्या पुजाराने चप्पल बाहेर काढण्यास सांगितले. या वरुन वाद झाला. याचा राग मनात धरुन पडळकर यांनी आपल्या समर्थकांसह गावात हल्ला चढवून मारहाण व जीवे मारण्याची धमकी देत गाड्यांची तोडफोड केली. या प्रकरणी 6 जणांच्या विरोधात शांताबाई मासाळ यांनी फिर्याद दाखल केली आहे.

मंदिरात चप्पल घालून आल्याने 2 गटात राडा

पडळकर आणि मासाळ गटात तुफान राडा

दोन दिवसांपूर्वी रात्री झालेल्या वादाच्या रागातून गावात पडळकर आणि मासाळ गटात जोरदार हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटाकडून दगड आणि काठ्यांनी मारामारी झाली. यात दोन चार चाकी गाड्यांची तोडफोड ही करण्यात आली आहे.

आमदार गोपीचंद यांच्या भावाचा समावेश

मासाळ यांच्या फिर्यादीनुसार वरून आटपाडी पोलीस ठाण्यांमध्ये आमदार भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह सहा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर ब्रह्मानंद पडळकर यांनी या घटनेशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबईच्या आयकर सहाय्यक आयुक्त विरोधातही गुन्हा

पडळकर गटाकडूनही विरोधी मासाळ गटाविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये सहा जणांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. यात मुंबईमधील आयकर सहाय्यक आयुक्त सचिन मोटे यांचा ही समावेश आहे.

एकूण १२ जणांवर गुन्हा दाखल

मासाळवाडी दोन गटात झालेल्या या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये बारा जणांच्या विरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे मासाळवाडी गावात तणावाचे वातावरण असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

हेही वाचा - माझ्या सोबत होतात तेव्हा काशीला जाऊन आंघोळ करत होता का ? सदाभाऊ खोतांचा शेट्टींवर पलटवार

हेही वाचा - नाराज सदाभाऊंची मनधरणी करण्यात भाजपाला यश; पुणे पदवीधर निवडणूकीतून रयतचा उमेदवार मागे

Last Updated : Nov 18, 2020, 5:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.