सांगली - ठेवीदारांनी कोणतीही भीती मनात न बाळगता बँकांमध्ये ठेवी ठेवाव्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi On DICGC) केलेल्या नव्या विम्या कायद्यामुळे त्यांचे पैसे आता बुडणार नाहीत, असा विश्वास केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil On DICGC) यांनी व्यक्त केला आहे. मिरजमध्ये सर्जेराव नाईक सहकारी बँकेच्या ठेवीदारांना 5 लाख पर्यंतच्या धनादेश परतावा वाटप सोहळ्यात ते बोलत होते.
बुडीत बँकेच्या ठेवीदारांना 5 लाखांपर्यंत रक्कम -
केंद्र सरकारच्या माध्यमातून आवसायानात गेलेल्या बँकेच्या ठेवीदारांना डिपॉझीट इन्शुरन्स क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कायद्या अंतर्गत पाच लाखापर्यंतचा परतावा धनादेश वाटप कार्यक्रम आज सांगलीच्या मिरजेतही पार पडला. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याहस्ते धनादेश वाटप करण्यात आला. या कार्यक्रमासाठी खासदार संजयकाका पाटील, निवासी जिल्हाधिकारी मौसमी बर्डे-चौगुले यांच्यासह लीड बँकेचे अधिकारी आणि ठेवीदार उपस्थित आहेत.
धनादेश वाटप सोहळ्यात ठेवेदारांना अश्रू अनावर -
आतापर्यंत पावसाळ्यात किंवा दिवाळखोरीत गेलेल्या बँकांच्या ठेवीदारांना केवळ 1 लाखापर्यंतच्या विमा संरक्षण मिळत होते. मात्र, केंद्र सरकारच्यावतीने नुकताच एक नवा कायदा करण्यात आला आहे. यामध्ये दिवाळखोरीत गेलेल्या बँकेच्या ठेवीदारांना पाच लाखांपर्यंतचा परतावा तो ही अर्ज केल्यापासून 90 दिवसांच्या आत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील दिवाळखोरीत गेलेल्या शिराळा येथील सर्जेराव नाईक सहकारी बँकेच्या 4 हजार 600 ठेवेदारांना नव्या विमा संरक्षण कायदया अंतर्गत 5 लाखांपर्यंत रक्कम देण्यात येत आहे. प्रतिनिधीक स्वरुपात यावेळी 8 ठेवीदारांना धनादेश सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना काही लाभार्थ्यांना आपले हक्काचे पैसे परत मिळत असल्याच्या भावनेने अश्रू अनावर झाले होते.
हेही वाचा - Omicron - राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा १८ वर, ९ रुग्णांना डिस्चार्ज