सांगली - आरक्षण व इतर मुद्यांवरून राज्याचे बट्ट्याबोळ करून वाटोळ करण्याचे काम महाविकास सरकारकडून सुरू असल्याचा घणाघाती आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच संजय राऊत यांनी वाघ पिंजऱ्यात असल्याचे मान्य केले याबद्दल आभार मानतो, असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे. ते इस्लामपूर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इस्लामपूर येथील नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुल याठिकाणी शनिवारी विविध कार्यक्रमानिमित्ताने उपस्थितीत लावली होती.याप्रसंगी माजी खासदार निलेश राणे, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा-धावत्या कारमध्ये धांगडधिंगा करणाऱ्या ४ तरुणांना अटक
मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका-
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना, चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मराठा आरक्षणावरून सरकारवर निशाणा निशाणा साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, की मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये भूमिका मांडली गेली नाही जे देवेंद्र करायचे ते,हे सरकार करत नाही,फक्त भेटी शिष्टमंडळा असा प्रकार सुरू आहे, त्यामुळे तुम्ही समाजाला मुर्ख समजता काय ? असा सवाल करत,जे 200 पाणी अहवाल न्यायालयात सादर केला. तो माझ्यासारख्या अनपढला 2 तासात वाचल्यावर सगळे कळते. मग तुम्हाला का कळत नाही. एवढंच जर कळत तर मग रिव्ह्यू दाखल करा , चालढकल पणा कश्याला करता ?
हेही वाचा-Maharashtra Breaking : रेल्वे रूळावर पावसाचे पाणी साचल्याने 'लोकल' ठप्प
सरकारकडून राज्याचा बट्ट्याबोळ...
जे ओबीसीसाठी ते मराठा समाजाला द्यायला काय अडचण आहे. तर राष्ट्रवादीकडून मराठा आरक्षण मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1 कोटी पत्र लिहण्याचा प्रकार दिशाभूल करणारा आहे. त्याचबरोबर सरकारच्या निष्क्रियेतेमुळे ओबीसी आरक्षणाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. आरक्षण आणि सर्व पातळ्यावर राज्याचा या सरकारने बट्ट्याबोळ करून टाकला आहे. या महाराष्ट्राचे वाटोळे करायचे या सरकारने ठरवले आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा-दरवाढीचा भडका! पेट्रोलबरोबर डिझेलने या शहरात ओलांडला शतकाचा उंबरठा
काय ती एकदा भूमिका घ्या..
संभाजीराजे यांच्या भूमिकेबाबत बोलताना पाटील म्हणाले, संभाजी राजे हे राजे आहेत. आमचे नेते आहेत. पण त्यांच्या मनात अजून ते भाजपचे खासदार असल्याबाबत संभ्रमावस्था आहे. पण कागदोपत्री ते भाजपाचे खासदार आहेत. मात्र ते राष्ट्रपती कोट्यातून खासदार झाल्याचे सांगतात. पण आम्ही त्यांना भाजपाचे खासदार आणि नेते मानतो. ते जाऊ दे ते आमचे राजे आहेत. त्यांनी नेतृत्व करावे. मात्र मराठा आरक्षणाबाबत धरसोड वृत्ती करू घेऊ नये. जो काय प्लॅन आहे तो एकदा मांडावा. त्यांनी वारंवार आंदोलनाबाबत भूमिका बदलली. आता ज्या पध्दतीने ते आंदोलन करणार आहेत, त्याने प्रश्न सुटणार आहे का ? असा टोला लगावला आहे.
संजय राऊत यांचा आभारी आहे...
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना दिलेल्या आवाहनावर बोलताना,आपण शिवसेनना पिंजऱ्यातला वाघ असल्याचे बोलले होते.आता त्यावर त्यांनी खुद्द मान्य केले की वाघ पिंजऱ्यात असतो. त्यामुळे संजय राऊत यांचे मी आभार मानतो, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.