सांगली: तासगाव शहरातील कापूर ओढा येथे पाण्याचा अंदाज न आल्याने पुलावरून कार वाहून गेली. (Car drown in flood). वाहत जाणारी गाडी बाहेर काढण्यात यश आले असले तरी गाडीतील उत्तम पाटील रा. वासुंबे हे व्यक्ती पाण्यात वाहून गेले आहेत. (driver missing in flood). ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात घटनेची नोंद केली आहे.
आठ दिवसांपासून सुरु आहे मुसळधार पाऊस: तासगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील इंदिरानगर झोपडपट्टी येथून तासगाव शहराकडे येण्यासाठी एक कच्चा रस्ता आहे. हा रस्ता कापूर ओढ्यातून येतो. याच ओढ्यात सिमेंटचा पाईप टाकून कच्चा पूल तयार करण्यात आला आहे. गेले आठ दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या पुलावरून पाणी गेले आहे.
वासुंबे येथील उत्तम रामराव पाटील हे आपल्या चारचाकी गाडीतून इंदिरानगरहून तासगाव शहराकडे येत होते. गाडी पुलावर आल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने कार पाण्यात बुडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील लोकानी धाव घेत गाडी पाण्यातून बाहेर काढली. मात्र गाडीतील व्यक्ती अजूनही बेपत्ता आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.