सांगली ऊसाच्या शेतात सुरू असलेली गांजाची लागवड गांजा शेती cannabin in sugarcane field Sangli पोलिसांनी उध्वस्त केली आहे. मिरजेच्या शिपुर येथे तब्बल पाऊण एकरमध्ये गांजा शेतीची लागवड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने State Excise Department raid cannabin field छापा टाकून कोट्यावधी रुपयांची 486 गांजाची झाडे जप्त Confiscation of marijuana plants Sangli करत या प्रकरणी एकास अटक केली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे केली कारवाई मिरज तालुक्यातल्या शिपुर या ठिकाणी उसाच्या शेतात करण्यात आलेल्या गांजा शेतीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पर्दाफाश करण्यात आला आहे.शिपुर येथील नंदकुमार बाबर यांच्या बाबर मळा,गट नंबर 313 मध्ये 30 गुंठे मध्ये चार फुटांवर एक गांजा लागवड करण्यात आल्याची माहिती मिरज उत्पादक शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी पहाटे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बाबर यांच्या शेतात छापा मारला असता, याठिकाणी उसाच्या शेतात आंतरपीक म्हणून गांजा लागवड करण्यात आल्याचे समोर आले,20 गुंठ्यांत पूर्ण वाढ झालेली गांजाची झाडे आणि 10 गुंठ्या मध्ये गांजाची लहान झाडे आढळून आली आहे.या छापा मध्ये सुमारे 486 गांजीची झाडे उखडून जप्त करण्यात आली आहेत.या झाडांचे वजन 1 हजार 59 किलो वजन असून बाजार भावनानुसार एक कोटी 5 लाख 92 हजार रुपये किंमत आहे,अशी माहिती सांगलीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांनी सांगितला आहे.तर या गांजा शेती प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.