सांगली - घरफोडी करणाऱ्या एका टोळीला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे.तिघा जणांना अटक करून त्यांच्याकडून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पैशाच्या वाटणीतून रस्त्यावर केलेल्या वादातून या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. टोळीकडून घरफोडीचे दहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
पैश्याच्या वाटणीचा वाद पडला महागात
सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घरफोडी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. सांगलीच्या जुना बुधगाव रोड वरील समाजकल्याण कार्यालयासमोर काही लोक पैशाच्या वाटणीवरून वादावाद आणि दंगा घालत असल्याची माहिती, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या ठिकाणी जाऊन गेंड्या उर्फ आकाश जाधव,वय वर्षे १९,करण रामा पाटील,वय २१आणि रोहित सपाटे,वय १९ या तिघांच्यासह एक विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे सोन्या-चांदीच्या दागिण्यासह सुमारे ५० हजारांचा मुद्देमाल आढळून आला.यानंतर तिघांना अटक करत अधिक चौकशी केली असता,
सांगली शहर आणि ग्रामीण हद्दीतील असे १० प्रकरण उघडकीस आले आहेत.अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी दिली आहे.
हेही वाचा-मनसुख हिरेन मृत्यु प्रकरण : एटीएसकडून घटनास्थळी नाट्य रूपांतर