सांगली - अभूतपूर्व उत्साहात महाराष्ट्रातील पहिली बैलगाडी शर्यत कवठेमहांकाळच्या नांगोळे या ठिकाणी पार पडल्या. ( Bullock Cart Race 2022 ) न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर पार पडलेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये धुरळा उडवत कोल्हापुरच्या संदीप पाटील यांच्या हरण्या-सोन्या जोडीने मैदान मारले आहे. सात वर्षानंतर पहिल्यांदा पार पडणाऱ्या बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी हजारो बैलगाडी शौकीनांनी हजेरी लावली होती. ( Bullock Cart Race Starts)
परवानगी नंतर पहिलीचं बैलगाडी शर्यत -
सात वर्षांपासून महाराष्ट्रात बंदी असणाऱ्या बैलगाडी शर्यतीला नुकतीच परवानगी मिळाली आहे. त्यानंतर शासनाच्या परवानगीनुसार महाराष्ट्रातील पहिली बैलगाडी शर्यत कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे या ठिकाणी पार पडली आहे. गावाच्या बाहेर असणाऱ्या माळरानावर बैलगाडी शर्यतीसाठी विशेष ग्राउंड करण्यात आले होते. पश्चिम महाराष्ट्रातून जवळपास 45 बैलगाड्या शर्यतीमध्ये सहभागी झाल्या होते. तीन गटांमध्ये या बैलगाडी शर्यत पार पडल्या आहेत. यामध्ये जनरल गटामध्ये कोल्हापूरच्या संदीप पाटील यांच्या हरण्या-सोन्या बैलाने मैदान मारले आहे. एक लाख रुपयांचे बक्षीस या हरण्या-सोन्याने शर्यतीमध्ये पटकावला. महाराष्ट्रात पहिल्यांदाच पार पडणाऱ्या या बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील बैलगाडी शौकीन मोठ्या संख्येने हजर होते. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात बैलगाडी शर्यती पार पडल्या आहेत.
हेही वाचा - Bullock Cart Race : राज्य सरकारने बैलगाडी शर्यत प्रकरणाचे गुन्हे आठ दिवसात मागे घ्यावेत- गोपीचंद पडळकर
धावताना बैल खाली पडला -
न्यायालयाच्या परवानगीनुसार बैल शर्यती दरम्यान बैल जखमी झाल्यास आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तर
या शर्यती दरम्यान बैलगाड्या धावत असताना एक बैलगाडी समोरच्या बैलगाडीवर जाऊन आदळली आणि एक बैल खाली कोसळला. त्यामुळे बैलगाडीवान देखील खाली कोसळला. मात्र, काही वेळात बैल उठून उभा राहिला. ही फार मोठी दुर्घटना नव्हती आणि गाडीवान किंवा बैल जखमी झाला नसल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.