ETV Bharat / state

सोन्या आला रे...! सांगलीतील 'हा' बैल 8 वर्षांपासून एकटा पोहोचवतो डेअरीवर दूध

जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेल्या कलमवाडी गावातील सोन्या नावाचा एक बैल या गावासाठी भूषण बनला आहे.

सोन्या आला रे...! सांगलीतील 'हा' बैल 8 वर्षांपासून एकटा पोहोचवतो डेअरीवर दूध
author img

By

Published : Jun 13, 2019, 10:14 PM IST

Updated : Jun 15, 2019, 4:55 PM IST

सांगली - जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेल्या कलमवाडी गावातील सोन्या नावाचा एक बैल या गावासाठी भूषण बनला आहे. गेले काही दिवस हा बैल खूपच चर्चेत असून गावकरी त्याच्याबरोबर फोटो आणि व्हिडिओ काढत आहेत. आपण सर्वसाधारणपणे कमी समज असलेल्या माणसांना बैलोबा म्हणतो, पण सोन्या बैल मात्र माणसांपेक्षा काकणभर अधिक हुशार असून त्याची हुशारी गावासाठी अभिमानाची गोष्ट बनली आहे.

सोन्या आला रे...! सांगलीतील 'हा' बैल 8 वर्षांपासून एकटा पोहोचवतो डेअरीवर दूध

शिवाजी साळुंखे यांच्या घरातील या बैलाला हाकण्याची गरज पडत नाही. तो रोज सकाळ संध्याकाळ दोन वेळा २०० लिटर दुधाचे कॅन बैलगाडीतून ३ किमी वर असलेल्या डेअरीपर्यंत एकटाच नेतो आणि रिकामे कॅन घेऊन घरी परत येतो. वाटेत रस्त्यात गाडी अथवा दुसरे वाहन आले तर रस्त्याच्या कडेला जाऊन त्या वाहनाला रस्ता देतो आणि वाहन गेले की पुन्हा रस्त्यावर येऊन मार्गक्रमण करतो. गावकऱ्यांना हे दृश इतके नेहमीचे झाले आहे की एखादा दिवस सोन्याला उशीर झाला तर गावकरी चिंतेत पडतात.

शिवाजी साळुंखे सांगतात सोन्याच्या जन्म त्यांच्या घराच्या गाईच्या पोटीच झाला आहे. त्यामुळे जन्मापासून तो आमच्या घराशी जोडलेला आहे. शिवाजी यांना 3 भाऊ आहेत, पण शिवाजी यांचे वडील सोन्याला त्यांच्या 4 था मुलगा मानतात. घरी १० एकर शेती, ४० जनावरे आहेत पण त्यातल्या कुणालाच सोन्याची सर नाही. शिवाजी सांगतात एकदा बैलगाडीतून ते दूध घालण्यासाठी डेअरीमध्ये चालले होते, तेव्हा रस्त्यात वैरण खरेदी करण्यासाठी उतरले. तोपर्यंत सोन्या डेअरीमध्ये पोहोचला होता. मग तेव्हापासून हे वळणच पडले आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

PKG .

FEED SEND FILE NAME - MH_SNG_SONYA_BAIL_13_JUNE_2019_VIS_1_7203751 - TO - MH_SNG_SONYA_BAIL_13_JUNE_2019_VIS_7_7203751

स्लग - आश्चर्यम..बिना मालकाचे "सोन्या बैल" करतो अफलातून कामगिरी..

अँकर - कधी कधी आपसूक म्हंटलं जातं ,माणसापरीस जनावरं बरी..आणि सांगलीच्या एका गावात ही म्हण खरी ठरत आहे..कारण एक बैल सालगडया प्रमाणे शेतीपूरक काम करतो..ऐकून आश्चर्य वाटले पण हे खरं आहे.सोन्या बैल,आपल्या मालकाने दिलेली सगळी काम एकटा करतोय,डेअरी मध्ये दूध पोचवण्यापासून शेतातुन वैरण आणण्याचे काम अगदी इमानी इतबारे करतोय..पाहूयात या सोन्या बैलाची कमाला..Body:
व्ही वो - खरंतर बैल हा शांत प्राणी व शेतकऱ्यांचा जोडीदार समजला जातो. शेतातल्या अनेक कामांसाठी शेतकरी आजही बैलाचा वापर करताना पाहायला मिळतो..पण शेतकऱ्याने जुंपल्याशिवाय बैल कोणतंच काम करत नाही,ही वास्तुस्थित,पण अश्या बैलांना सांगलीच्या वाळवा तालुक्यातील काळमवाडी येथील शेतकरी शिवाजी साळुंखे यांचा "सोन्या बैल" अपवाद ठरला आहे.कारण सोन्या बैल साधा-सुधा बैल नसून अतिशय हुशार बैल आहे.
आठ वर्षापासून सोन्या बैल मालका विना अनेक कामे बैलगाडी घेऊन करत आहे. ऐकून आपल्या सगळ्यांना थोडं आश्चर्य वाटेल,पण सोन्या बैल' हा साळुंखे यांच्या जनावरांचे दूध गावातील डेअरीमध्ये पोहोचण्या पासून शेतातील वैरण गोठ्यामध्ये आणण्यापर्यंतची काम एकटा करतो..गाडीला सोन्याला जुंपल की सोन्या गाडीवानाच्या विना ही काम करतो.

शिवाजी साळुंखे यांना चार मुले आहेत.आणि शेती 10 एकर आहे.तर त्यांच्याकडे गाई आणि म्हैस अशे तब्बल ४० जनावरे आहेत.त्यापैकी एक देशी गाईचे सोन्या हा बैल.10 वर्षांपासून आपल्या मुला प्रमाणे सोन्याला साळुंखे कुटुंब सांभाळत आहेत.असेच एक दिवशी शिवाजी साळुंखे आपल्या शेतात वैरण काढून गाडीत ठेवत असताना सोन्या पुढे जायचा, तसेच गोठयातुन दूध वाहतूक करण्यासाठी साळुंखे हे बैलगाडीचा वापर करतात ,या दरम्यान सोन्याला अनेकवेळा त्यांनी सोन्याला जुंपून डेअरीकडे घेऊन जायचे , काही दिवसांनी सोन्या गाडी दुधाचे कॅन ठेवल्यानंतर आपण चालू लागला आणि हे शिवाजी साळुंके यांच्या लक्षात ही गोष्ट आली आणि मग साळुंखे हे सोन्याला एकटे पाठवू लागले, तेंव्हा पासून सोन्या अगदी बिनचूकता ,३ किलोमीटर लांब गावात दूध पोहचवून पुन्हा घरी परतणे , शेतात मालका बरोबर जाऊन वैरण जनावरांच्या गोठयापर्यंत पोहोचवण्याचे काम अगदी अचूक करतो.

बाईट - शिवाजी साळुंखे - सोन्याचे मालक - काळमवाडी,वाळवा,सांगली.

व्ही ओ - सोन्या बैल हा सकाळी उठल्यावर शेताकडे जातो.त्यानंतर तो दूध घेऊन तब्बल 3 किलो मीटर गावाकडे जातो..त्याच्या गाडीत पाच कँन असतात त्यामध्ये 200 लिटर दुध असते.विशेष म्हणजे हे दूध न सांडता तो जात असतो.तर अगदी एका माणसा प्रमाणे रस्त्याच्या कडेने जात असतो.तर एखादी गाडी मागून आली की गाडीला सोन्या साईड देतो.गावातून जाताना कुठे वळायचे आहे ,हे नेमके सोन्या बैलाच्या ध्यानात असते.अशा पद्धतीने सोन्या दररोज मालक बैलगाडी नसताना दूध डेअरी गाठतो..

गावात दररोज गावकरी सोन्याची वाट पाहत असतात.आणि सोन्याने गावात एन्ट्री केली,की लोक सोन्या आला रे अशी आरोळी ठोकत,आणि सोन्याच्या भोवती मग बालगोपाल पासून वयोवृद्धांच्या पर्यंत सगळ्यांच्या घोळका जमतो,मग कुणी सोन्या सोबत फोटो काढण्यासाठी, तर कुणी सोन्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी धडपडत असतो, त्यामुळे सोन्या बैलाचा लळा गावकरयांना लागला आहे.Conclusion:खरे तर शेतकरी आणि बैल यांच नातं खूप जुनं आहे,त्यामुळे शेतकऱ्यांचा जोडीदार म्हणून बैलाला ओळखले जातं, पण मालकाविना काम करण्याची सोन्या बैलाच्या अफलातून कामगिरी थक्क करणारी म्हणावी लागेल..
Last Updated : Jun 15, 2019, 4:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.