ETV Bharat / state

Little Siblings Found In Well: बेपत्ता असणाऱ्या चिमुरड्या बहिण-भावांचे मृतदेह आढळले विहिरीमध्ये - लहान बहिण भाऊ विहिरीत पडली

गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असणारे जतच्या अमृतवाडी येथील दोघा बहीण-भावांचे मृतदेह विहिरीमध्ये आढळून आले आहेत. एका शेतमजुराची ही दोन मुले चार दिवसांपासून बेपत्ता होती. अखेर त्यांचे मृतदेह एका विहिरीत आढळून आले. सुलोचना गवळी (वय 5 वर्षे) आणि इंद्रजीत गवळी (वय 3 वर्षे) अशी या दोन चिमुरड्यांची नावे आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Little Siblings Found In Well
बहिण-भावांचे मृतदेह आढळले विहिरीमध्ये
author img

By

Published : Feb 12, 2023, 9:27 PM IST

लहान बहिण-भाऊ विहिरीत पडून मृत पावल्याने गावात हळहळ

सांगली: नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा येथील आनंद गवळी आणि त्यांच्या पत्नी हे दोघेजण जत तालुक्यातल्या अमृतवाडी येथील बागायतदार शेतकरी दीपक हत्ती यांच्याकडे कामाला होते. चार दिवसांपूर्वी आनंद गवळी यांच्या पत्नीची तब्येत बिघडल्याने उपचारासाठी आनंद गवळी यांनी पत्नीला जत या ठिकाणी उपचारासाठी नेले होते. यावेळी त्यांची असणारी चार मुले घरात होती. सायंकाळी परत आल्यानंतर त्यांची दोन मुले झोपलेली आढळून आली. तर सुलोचना आणि इंद्रजित ही मुले गायब असल्याचे निदर्शनास आले. यानंतर दोन्ही भावंडांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली.

विहिरीत आढळले मुलांचे मृतदेह : गावात आणि जत पोलीस पोलिसांच्याकडून देखील या मुलांचा शोध घेण्यात येत होता. तर मुले सापडत नसल्याने अपहरणाची तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. यानंतर घराजवळ असणाऱ्या एका विहिरीमध्ये ही मुले पडल्याचा संशय आल्याने, त्या ठिकाणी देखील शोध मोहीम राबवण्यात आली होती. मात्र त्या विहिरीत मुले आढळून आली नव्हती. सर्वत्र शोध मोहीम राबवून देखील मुले सापडत नसल्याने नेमके या मुलांचे काय झाले असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. मात्र अखेर आज दुपारी घरापासून काही अंतरावर असणाऱ्या दुसऱ्या विहिरीमध्ये दुपारी या दोन्ही मुलांचे मृतदेह तरंगताना आढळून आली. याबाबत अधिक तपास केला जात आहे.

मुलगी सेप्टिक टॅंकमध्ये पडली: नागपुरात सेप्टिक टॅंकमध्ये बुडून 5 वर्षीय मूक मुलीचा मृत्यू झाल्याची घटना अलीकडेच घडली आहे. ही मुलगी 10 फेब्रुवारी, 2023 रोजी उघड्या पाण्याच्या टाकीत पडली होती. बेलतरोडी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी ज्योतीचा मृतदेह उत्तरीय तपासणी करता पाठवून चौकशीला सुरुवात केली. ज्योती राजू साहू असे मृत मुलीचे नाव आहे. ती 9 तारखेपासून बेपत्ता होती. काल दुपारी ती खेळायला गेली होती. खेळखेळता ती टाकीत पडली असावी. परंतु ज्योतीला बोलता येत नसल्याने ज्योती ओरडू शकली नाही. त्यामुळे तिचा बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज बांधला जात आहे.

मुलाला सुखरूप वाचविले : उत्तरप्रदेशच्या हापूर जिल्ह्यात एक सहा वर्षीय मुलगा 10 जानेवारी, 2023 रोजी ४० फूट खोल अशा बोअरवेलमध्ये पडला होता. त्यानंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले. त्याला वाचवण्यासाठी एनडीआरएफ टीमची मदत घेण्यात आली. मुलापर्यंत दूध आणि पाण्याची बाटली पोहोचवण्यात आली. अखेर पाच तासांच्या प्रयत्नानंतर एनडीआरएफच्या पथकाने मुलाला बोअरवेलमधून बाहेर काढले.

बोअरवेलमध्ये पडला बालक: हापूर पोलिस ठाणे ग्रामीण हद्दीतील मोहल्ला फुलगढी येथे धक्कादायक घटना घडली. एक 6 वर्षीय बालक खेळत असताना बोअरवेलमध्ये पडला होता. सुमारे ४० फूट खोल बोअरवेलमध्ये बालक पडल्याने एकच खळबळ उडाली होती. बोअरवेलमधून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येत होता. गाझियाबादहून घटनास्थळी पोहोचलेली एनडीआरएफच्या पथकाने बचावकार्य करत त्या मुलाला सुखरूपपणे बाहेर काढले. रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची टीमही घटनास्थळी हजर होती.

हेही वाचा : Marathi Breaking News : पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 25 लाखांच्या मदतीची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.