सांगली - शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी पक्ष संपवायचे ठरवले आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil criticize shivsena in Islampur ) यांनी केली आहे. आज गावागावांत भाजपची ताकत आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेचे लोक कमी संख्येत आहेत, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लागवला. तसेच, आगामी सर्व स्थानिक निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढवल्या जातील, असे पाटील यांनी स्पष्ट केले. ते इस्लामपूर या ठिकाणी बोलत होते.
हेही वाचा - मंत्री बच्चू कडू यांचा सरकारला घरचा आहेर.. वीज बिल, एसटी आंदोलनावरून ठाकरे सरकार इशारा
मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना संपवली
इस्लामपूर येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या विजयी झालेल्या उमेदवारांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या समारंभामध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने सर्व पक्ष संपवायचे ठरवले आहे. राज्यात पार पडलेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये भाजप हा एक नंबरचा पक्ष राहिला आहे, आणि आता गावागावांत भाजपची ताकद वाढली आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेचे लोक कमी संख्येत आहेत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. त्याचबरोबर आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढवल्या जातील. स्थानिक पातळीवर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर, त्या - त्या जिल्हाध्यक्षाने भाजप प्रदेश अध्यक्ष म्हणून माझ्याबरोबर आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करावी. शिवाय कोणताही निर्णय परस्पर घ्यायचा नाही, असे ठरल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - Winter Season : हिवाळ्यात 'अशी' घ्या नवजात शिशू व लहान मुलांची काळजी...