ETV Bharat / state

हे सरकार बहुजनद्वेष्टे, काका-पुतण्यांपुढे माना डोलवणारे काँग्रेसचे मंत्री लाचार - आमदार पडळकर - आमदार पडळकरांची टीका

शरदचंद्र पवार यांच्या पुढाकाराने स्थापित झालेले सरकार किती बहुजनद्वेष्टे आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यांना मराठा आरक्षणाविषयी, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी आणि पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात कुठलेही पाऊल उचलण्याची घाई नाही. पण न्यायालयाच्या निर्णयाआधीच आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची लगबग उडाली आहे, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

आमदार पडळकर
आमदार पडळकर
author img

By

Published : Jun 4, 2021, 1:29 PM IST

Updated : Jun 4, 2021, 6:50 PM IST

सांगली - पदोन्नतीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजपाचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यांना पदोन्नती सेवा ज्येष्ठतेनुसार मर्जीतल्या ठिकाणी नियुक्ती देण्याचे आदेश जारी केले आहेत, असा आरोप पडळकरांनी केला आहे. तसेच काँग्रेसचे नेते सत्तेसाठी लाचार झाले आहेत, याबाबत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींना याबाबत पत्र लिहणार असल्याचे म्हणत पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते आटपाडीच्या झरे येथे ते बोलत होते.

आमदार पडळकर

पवारांचे आघाडी सरकार बहुजनद्वेष्टे-

आमदार पडळकर म्हणाले, शरद पवार यांच्या पुढाकाराने स्थापित झालेले सरकार किती बहुजनद्वेष्टे आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यांना मराठा आरक्षणाविषयी, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी आणि पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात कुठलेही पाऊल उचलण्याची घाई नाही. पण न्यायालयाच्या निर्णयाआधीच आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची लगबग उडाली आहे, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

लाचार काँग्रेस मंत्र्यांबाबत सोनिया गांधींना पाठवणार पत्र...

पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा शासन आदेश मागे घेण्याऐवजी उलट आरक्षण रद्दचा निर्णय अंमलात आणत राज्य सरकारने तब्बल 67 कक्ष अधिकाऱ्यांना अव्वर सचिवपदावर' सेवाज्येष्ठते'नुसार बढती दिली. तर पदोन्नतीतील आरक्षण पुन्हा लागू करा आणि शासन आदेश मागे घ्या, या मागणीसाठी आधी आक्रमक आणि आता मवाळ झालेल्या काँग्रेसची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या फेटाळून लावली. त्यामुळे सत्तेचे वेसन बांधलेले काँग्रेसचे लाचार मंत्री काका-पुतण्यापुढे फक्त माना डोलवत आहेत. यामुळे मी लवकरच काँग्रेस नेत्या सोनिया गांधींना, तुमचे मंत्री किती फुले, शाहू,आंबेडकरांच्या विचारांशी प्रेरित होऊन सत्तेत काम करतात, याची माहिती देणार असल्याचे आमदार पडळकर यांनी स्पष्ट केले आहे.

Last Updated : Jun 4, 2021, 6:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.