ETV Bharat / state

Gopichand Padalkar : शिंदे गटाचे आमदार अनिल बाबरांच्याबाबत गोपीचंद पडळकरांचा गौप्यस्फोट, म्हणाले.... - भाजप आमदार गोपीचंद पडळकर

शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर ( Shinde group MLA Anil Babar ) हे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत खानापूर-आटपाडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत, असा गौप्यस्फोट भाजप आमदार गोपीचंद पडळकर ( BJP MLA Gopichand Padalkar ) यांनी करत खानापूर आटपाडी मतदार संघात 2024 मध्ये भाजपचा उमेदवार असेल आणि तो उमेदवार आपण असल्याचे अप्रत्यक्ष जाहीर केले आहे.

Gopichand Padalkar
गोपीचंद पडळकर
author img

By

Published : Dec 26, 2022, 6:13 PM IST

भाजप आमदार गोपीचंद पडळकर सांगलीत बोलताना

सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आपल्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील मोही याठिकाणी आयोजित कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर ( BJP MLA Gopichand Padalkar ) यांनी मोठा गौप्यस्फोट ( secret explosion regarding Shinde group MLA Anil Babar ) केला. ते म्हणाले की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर हे खानापूर-आटपाडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

फडणवीसांमुळे बाबर आमदार : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील मोही येथे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते नुकतेच ग्रामपंचायत व सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांचा सत्कार पार पडला आहे. यावेळी आयोजित सभेत बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या बाबतीत गौप्यस्फोट केले आहे. केवळ 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळे अनिल बाबर आमदार झाले.

काय म्हणाले पडळकर : आपण त्यावेळी बारामती मतदारसंघाची निवडणूक लढवत असताना बारामतीमध्ये भल्या पहाटे भेट अनिल बाबर व त्यांचे जेष्ठ सुपुत्र अमोल बाबर हे भेटायला आले होते. त्यांनी पाठिंबा घेत 2024 ची विधानसभा निवडणुक अनिल बाबर लढवणार नसल्याचा शब्द देत 2024 च्या खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात तुम्हाला पाठिंबा देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे 2024 ला अनिल बाबर निवडणूक लढवणार नाहीत,असा गौप्यस्फोट आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तसेच 2024 च्या विधानसभा निवडणूकीत खानापूर आटपाडी मतदारसंघात भाजपाचा उमेदवार आणि ते आपण असणार असल्याचे जाहीर केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.