ETV Bharat / state

महापौर निवडणूक : सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवारांचे अर्ज दाखल - sangli corporation election

सांगली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुका पार पडत आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी भाजपकडून आणि काँग्रेस, राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

sangli
सांगली पालिका
author img

By

Published : Feb 18, 2021, 8:12 PM IST

सांगली - सांगली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुका पार पडत आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी भाजपकडून आणि काँग्रेस, राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. भाजपच्या नाराजीचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला होईल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

पृथ्वीराज पाटील - जिल्हाध्यक्ष, काँग्रेस, सांगली

महापौर व उपमहापौर निवडणूक

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुका पार पडत आहेत.अडीच वर्षाचा कार्यकाळ महिला राखीव होता.आणि आता अडीच वर्षाचा पुरुष राखीव हा कार्यकाळ आहे. त्यामुळे या निवडणुका पार पडत आहेत.

सांगली महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या ठिकाणी विरोधात आहे. 23 फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली आहे. त्यामध्ये सत्ताधारी भाजपकडून महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी यांनी तर उपमहापौरपदासाठी गजानन मगदूम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीचीही निवडणुकीत उडी

या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे. महापौर पदासाठी मैनुद्दीन बागवान आणि दिग्विजय सुर्यवंशी यांनी उमेदवारी दाखल केली आहेत. तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडून उमेश पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सविता मोहिते आणि स्वाती पारधी यांनी उमेदवारी दाखल केली आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असताना देखील काँग्रेस-राष्ट्रवादीने या निवडणुकीमध्ये आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जोरदार चर्चा सुरू आहे, तर काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याने त्याचा फायदा काँग्रेस- राष्ट्रवादीला होईल, आणि आपला विजय होईल, असा दावा केला आहे.

विद्यमान महापौरांची अनुउपस्थिती

उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, विद्यमान महापौर गीता सुतार या अनुउपस्थित होत्या. वास्तविक पक्षाच्या उमेदवाराच्या अर्ज भरणीला महापौरांची उपस्थित असणे गरजेचे होते. मात्र त्या उपस्थित नव्हत्या, त्यामुळे भाजपमध्ये नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळाले.

करेक्ट कार्यक्रमची भाजपला भिती

महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे, मात्र भाजपचे बऱ्यापैकी नगरसेवक हे राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते आहेत. यातील काही नगरसेवकांच्या आणि राष्ट्रवादीचे नेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यात हाडवैर आहे. यापैकी मिरजेचे भाजप नेते सुरेश आवटी यांचे पुत्र निरंजन आवटी यांच्या महापौर पदासाठी आवटी गटाने आग्रह धरला होता. मात्र राष्ट्रवादीच्या गोटातून निरंजन आवटी यांच्या उमेदवारीला विरोध करत महापौर निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिला होता, आणि यामुळेच भाजपने कोणताही धोका न पत्करता निरंजन आवटी यांच्या उमेदवारीला बगल देत धीरज सुर्यवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.