ETV Bharat / state

वैद्यमापन कार्यालयाचा कारभार राम भरोसे ! भाजपने रिकाम्या कार्यालयाच्या दारावर चिटकवले निवेदन - सांगलीत भाजपचे आंदोलन

साखर कारखानादारांच्या काटा मारी विरोधात निवेदन देण्यासाठी वैद्यमापन शास्त्र या शासकीय कार्यालयात पोहोचलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांना ओस पडलेल्या कार्यालयात तब्बल 2 तास ताटकळत राहावं लागल्याचा प्रकार सांगलीमध्ये घडला आहे.

bjp agitation against government office
bjp agitation against government office
author img

By

Published : Jan 22, 2021, 12:13 AM IST

Updated : Jan 22, 2021, 12:34 AM IST

सांगली - साखर कारखानादारांच्या काटा मारी विरोधात निवेदन देण्यासाठी वैद्यमापन शास्त्र या शासकीय कार्यालयात पोहोचलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांना ओस पडलेल्या कार्यालयात तब्बल 2 तास ताटकळत राहावं लागल्याचा प्रकार सांगलीमध्ये घडला आहे. कार्यालयात ना शिपाई, ना अधिकारी. त्यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी थेट कार्यालयाच्यादारावर निवेदन चिकटत वैधमापन कार्यालयाच्या कारभाराचा निषेध नोंदवला आहे.

भाजपचे सांगली जिल्हा (ग्रामीण) माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड
कारखानादारांच्याकडून काटा मारी..!सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार यांच्याकडून उसाच्या वजनामध्ये काटा मारी करण्यात येत असल्याचा आरोप भाजपाचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड यांनी केला आहे. याबाबत कारखानदारांच्या विरोधात कारवाई व विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यासाठी सांगलीच्या मध्यवर्ती शासकीय कार्यालयातील वैद्यमापन शास्त्र कार्यालयात पोहोचलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना वजन मापन शास्त्र कार्यालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.राजाराम गरुड व पदाधिकारी यावेळी कार्यालयात पोहोचले. त्यावेळी कार्यालयात कोणतेही अधिकारी अथवा शिपाई सुद्धा उपस्थित नव्हते. तब्बल दोन तास राजाराम गरुड व भाजपाचे कार्यकर्ते या कार्यालयात ठाण मांडून होते आणि या सर्व घटनेचे गरुड यांनी चित्रीकरण सुद्धा केलं.दारावर निवेदन चिकटवत दिला इशारा -त्यानंतर भाजपच्या संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन थेट कार्यालयाच्या आधारावर चुकवला आणि त्यानंतर अर्ध्या तासाने कार्यालयातील अधिकारी पोहोचले आणि त्यांनी भाजपाचा निवेदन स्वीकारले दरम्यान गरुड यांनी या कारभाराचा निषेध नोंदवत या खात्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाच्या कारभाराची दखल घ्यावी, तसेच वैद्यमापन कार्यालयाने येत्या पंधरा दिवसात साखर कारखानदारांच्या विरोधात काटा मारी बाबत योग्य ती कारवाई करावी,ती न झाल्यास धरणे आंदोलन करू,असा इशारा भाजपाच्या वतीने राजाराम गरुड यांनी दिला आहे.

Last Updated : Jan 22, 2021, 12:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.