ETV Bharat / state

तीन दिवसांपासून झाडावर अडकलेल्या घारीची सुखरूप सुटका

उंच झाडावर घार अडकल्याचे लक्षात येताच त्यांनी सांगली महापालिकेच्या अग्निशमन पथकला मदतीसाठी पाचारण केले.

झाडावर अडकलेल्या घारीची सुखरूप सुटका
author img

By

Published : May 8, 2019, 12:15 PM IST

सांगली - पंखांमध्ये मांजा दोर अडकून ३ दिवसांपासून एका झाडावर अडकलेल्या घारीची रेस्क्यू ऑपरेशनद्वारे सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सांगलीतील प्राणीमित्र आणि पालिकेच्या अग्निशमन पथकाने रेस्क्यू करत घारीला जीवदान दिले आहे.

झाडावर अडकलेल्या घारीची सुखरूप सुटका

सांगली शहरातील वॉटर हाऊसच्या मागे एका झाडावर गेल्या तीन दिवसांपासून घार अडकून होती. तिच्या पंखांभोवती नॉयलन मांजाचा दोर अडकला होता. त्यामुळे तिला उडता येत नसल्याने ती झाडावर अडकून होती. घारीच्या ओरडण्याने येथील नागरिकांनी घार अडकल्याची कल्पना प्राणीमित्रांना दिली. यानंतर काही वेळातच प्राणिमित्र मुस्तफा मुजावर आपल्या टीमसह याठिकाणी दाखल झाले. उंच झाडावर घार अडकल्याचे लक्षात येताच त्यांनी सांगली महापालिकेच्या अग्निशमन पथकला मदतीसाठी पाचारण केले. एका तासांच्या रेस्क्यूनंतर झाडावर अडकलेल्या घारीला खाली उतरवले. यानंतर तिच्या पंखांमध्ये अडकलेल्या मांजाचा गुंता सोडवला आणि तीन दिवसांपासून अडकून पडलेल्या घारीची सुटका करण्यात आली.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AVB

Feed send file name - R_MH_1_SNG_07_MAY_2019_GHAR_SUTKA_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_4_SNG_07_MAY_2019_GHAR_SUTKA_SARFARAJ_SANADI

स्लग - तीन दिवसांपासून झाडावर अडकलेल्या घारीची रेस्क्यू करत केली सुखरूप सुटका..

अंकर - पंखांमध्ये मांजा दोर अडकुन तीन दिवसांपासून एका झाडावर अडकलेल्या घारीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.सांगलीतील प्राणीमित्र आणि पालिकेच्या अग्निशमन पथकाने रेस्क्यू करत घारीला जीवदान दिले आहे. Body:व्ही वो - सांगली शहरातील वॉटर हाऊसच्या मागे एका झाडावर गेल्या तीन दिवसांपासून घार अडकून होती.तिच्या पंखांच्या भोवती नॉयलनचा मांजा दोर अडकला होता.त्यामुळे तिला उडता येत नसल्याने ती झाडावर अडकून होती.तर
घारीच्या ओरडण्याने याठिकाणच्या नागरिकांनी घार अडकल्याची कल्पना प्राणीमित्रांना दिली.यानंतर काही वेळातच प्राणिमित्र मुस्तफा मुजावर आपल्या टीम सह याठिकाणी दाखल झाले.तर उंच झाडावर घार अडकल्याचे लक्षात येताच त्यांनी सांगली महापालिकेच्या अग्निशमन पथकला मदतीसाठी पाचारण केले. आणि १ तासांच्या रेस्क्यू नंतर झाडावर अडकलेल्या घारीला खाली उतरवले.यानंतर तिच्या पंखांमध्ये अडकुन मांजाचा झालेला गुंता सोडवला आणि गेल्या तीन दिवसांपासून उपाशीपोटी अडकून पडलेल्या घारीची सुटका केली आहे.तर नागरिकांनी आणि विशेषतः मुलांनी बंदी असलेला मांजा पतंग उडवण्यासाठी वापरू नये, ज्यामुळे पक्षांच्या जीवाला धोका निर्माण होईल,असे आवाहन यावेळी केली आहे.

बाईट - मुस्तफा मुजावर - प्राणीमित्र, इंसाफ फाऊंडेशन ,सांगली. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.