ETV Bharat / state

Sangali Police : बंगाली कारागिराकडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी, सव्वा नऊ लाखांचे दागिने जप्त - police seize seventy nine lakh worth Jewelry

सांगलीत बंगाली कारागिराने सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून धूम ठोकल्याचा प्रकार ( Bengali artisan theft gold Jewelry ) घडला. त्याच्याकडून यावेळी सव्वानऊ लाखांचे 185 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले ( police seize seventy nine lakh worth Jewelry ) आहेत.

सांगली शहर पोलीस
Sangli City Police
author img

By

Published : Nov 20, 2022, 12:06 PM IST

सांगली : शहरातल्या एका सराफ दुकानात कामगार म्हणून असणाऱ्या एका बंगाली कारागिराने सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून धूम ठोकल्याचा प्रकार ( Bengali artisan theft gold Jewelry ) घडला होता. याबाबत सांगली शहर पोलिसांनी गतीने तपास करत उस्मानअली अलीमंडल या चोरी करणाऱ्या कामगाराला नांदेडमधून अटक केली आहे. त्याच्याकडून यावेळी सव्वानऊ लाखांचे 185 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले ( police seize seventy nine lakh worth Jewelry ) आहेत.

सोन्याच्या दागिन्यांची चोरी : शहरातल्या गणपती पेठ या ठिकाणी जाधव यांच्या असणाऱ्या गोल्ड स्मिथ सराफ दुकानांमध्ये उस्मानाली हा कामाला होता. बंगाली कारिगार म्हणुन तो काम करत असे. दरम्यान मंगळवारी दुकानात कोणी नव्हेत, सराफ मालक जाधव व इतर जण काम निमित्ताने बाहेर गेले होते. यावेळी दुकानांमध्ये कोणी नसल्याचा फायदा उठवत,उस्मान याने दुकानात असणारे 185 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. जाधव हे परत आले असतात त्यांच्या दुकानांमध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याचवेळी त्यांच्या दुकानातल्या बंगाली कार्यकर्त्यांना उस्मान हा गायब असल्याचे हे त्यांना दिसून आले.

sangali police

सव्वानऊ लाखांचे दागिने हस्तगत : यानंतर जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन चोरीची फिर्याद दाखल केली होती, सांगली पोलिसांनी चोरीचा गतीने तपास सुरू केला होता आणि मोबाईल लोकेशन ट्रॅक करत उस्मान याचा पाठलाग सुरू केला. ज्यामध्ये नांदेड या ठिकाणी पळून जाण्याच्या तयारीत असताना उस्मान याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून यावेळी चोरलेले 185 ग्रॅम वजनाचे सव्वानऊ लाखांचे दागिने हस्तगत केले असल्याची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय सुतार यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.