ETV Bharat / state

शिथिलता मिळताच खरेदीसाठी गर्दीचा पूर! - सांगलीत कडक निर्बंधात शिथिलता

शिथिलता मिळताच खरेदीसाठी गर्दीचा पूर आल्याचे पहायला मिळाले. दोन महिन्यानंतर कडक निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे.

As soon as they got a discount in the lockdown, people rushed to the Sangli market to shop
शिथिलता मिळताचं खरेदीसाठी गर्दीचा पूर!
author img

By

Published : Jun 1, 2021, 5:25 PM IST

सांगली - लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्याने सांगलीमध्ये गर्दीचा पूर पाहायला मिळाला आहे. दोन महिन्यापासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू आहेत. यामध्ये आजपासून शिथिलता देण्यात आल्याने नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

शिथिलता मिळताचं खरेदीसाठी गर्दीचा पूर !

2 महिन्यानंतर सांगलीकरांना दिलासा -

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात 5 एप्रिल पासून कडक निर्बंध लागू होते. आरोग्य सेवा वगळता अत्यावश्यक सेवेतील इतर सेवा बंद होत्या. राज्य सरकारकडून 1 जूनपासून ज्या जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्केच्या खाली आहे, त्या जिल्ह्यात शिथिलता देण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सांगली जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी दर हा 17 टक्क्यावर आल्याने प्रशासनाकडून जिल्ह्यात देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी 7 ते 11 यावेळेत विक्रीसाठी परवानगी दिली आहे.

शिथिलता मिळताच रस्त्यावर गर्दीचा पूर -

मंगळवारी सकाळपासून जिल्ह्यात मिळालेल्या शिथिलतेमुळे किराणा, फळ, बेकरी, दूध डेअरी, मिठाई, चिकन/मटण दुकानांसह भाजी मंडई सुरू झाल्या. सांगली शहारत खरेदी करण्यात बाजारात नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची दिसून येत होती. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत गर्दीचा पूर आल्याची परिस्थिती पाहायला मिळाली. शहरातील मारुती चौक, शिवाजी मंडई यासह अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे चित्रही पाहायला मिळाले. शिथिलतेच्या पहिल्याचं दिवशी उसळलेली गर्दी यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.