सांगली - इस्लामपूर शहरात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड अँटिजेन तपासणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेतून 8 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. वाळवा तालुका आरोग्य विभागाच्या कारवाईमध्ये ही बाब निदर्शनास आली आहे.
रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजेन टेस्ट, 8 जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह
इस्लामपूर शहरात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड अँटिजेन तपासणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेतून 8 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
Antigen test
सांगली - इस्लामपूर शहरात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड अँटिजेन तपासणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेतून 8 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. वाळवा तालुका आरोग्य विभागाच्या कारवाईमध्ये ही बाब निदर्शनास आली आहे.
लॉकडाऊन असतानाही अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरून कोरोना संसर्ग वाढवण्याचे काम करत आहेत. अशा व्यक्तींवर कारवाईऐवजी थेट त्यांची अँटीजेन टेस्ट करण्याची कारवाई मोहीम इस्लामपूर शहरात सुरू करण्यात आली आहे. वाळवा तालुका आरोग्य विभाग आणि नगरपालिका व पोलीस प्रशासानाच्यावतीने जे लोक विनाकारण फिरत आहेत, त्यांची रॅपिड अँटिजेन तपासणी करण्यात येत आहेत. सोमवारी या कारवाईमध्ये 3 जण पॉझिटिव्ह असल्याची बाब समोर आली. तर मंगळवारी पथकाकडून शहरातील शिराळा नाका येथे विनाकारण फिरणाऱ्या लोकांना पकडून त्यांची टेस्ट केली असता, यामध्ये 8 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात वाळवा तालुक्यातील रेठरे, शिवापूरी येथील 7 आणि सांगलीमधून आलेल्या 1 जणाचा समावेश आहे. त्यांच्यावर आता कोविड सेंटरमध्ये उपचाराची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी सांगितले आहे.

Last Updated : Apr 20, 2021, 5:22 PM IST