सांगली - शिवसेनेला ( Shiv Sena ) सांगली जिल्ह्यामध्ये धक्का बसला आहे. शिवसेनेचे कित्येक वर्ष ग्रामीण जिल्हा प्रमुख असणारे आनंद पवार यांनी अखेर उद्धव ठाकरे यांची साथ सोडत, शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे .कट्टर शिवसैनिक म्हणून आनंद पवार यांची ओळख आहे. मात्र, आनंद पवारांनी आता आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या गटात सामील झाले आहेत. शिवसेनेतल्या बंडखोरीनंतर आनंद पवार (Shiv Sena district chief Anand Pawar ) यांनी इस्लामपूरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत एकनाथ शिंदेंचे समर्थन या आधीच केलं होतं. गेल्या अडीच वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून प्रचंड त्रास देण्यात आला. माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हा त्रास दिल्याचा आरोप देखील आनंद पवार यांनी केला होता.
विधानसभेच्या पहिल्या अधिवेशना दरम्यान पहिल्याच भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना आनंद पवार यांच्या नावाचा उल्लेख केला होता. आंनद पवारसह त्यांच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस ( Nationalist Congress Party ) पार्टीकडून कसा त्रास देण्यात आला, याचा पाढा वाचला होता. विधानसभेमध्ये उपस्थित असणाऱ्या जयंत पाटलांना देखील याची कल्पना देत त्यांनी शिवसैनिकाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्रास झाल्याचं स्पष्ट केले होते. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या विधानसभेतल्या भाषणानंतर जिल्हाप्रमुख असणाऱ्या आनंद पवार यांनी शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला. त्यांनी उध्दव ठाकरे यांची साथ सोडून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातची वाट धरल्यामुळे कार्यकर्ते आश्चर्य चकित झाले आहे.
हेही वाचा - Bhavana Gawali : महाराष्ट्रातील झटक्यानंतर शिवसेना सावध; प्रतोद पदावरुन भावना गवळींची उचलबांगडी