ETV Bharat / state

सांगलीतील ऐतवडे खुर्द ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट - सांगली कोरोना लेटेस्ट न्यूज

या बंद दरम्यान गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व संस्था बँका पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. तसेच गावात कोरोना मृत्यूचे प्रमाणही अधिक असल्याने गाव पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

sangli
sangli
author img

By

Published : May 23, 2021, 11:11 AM IST

सांगली - जिल्ह्यातील ऐतवडे गावात कोरोनाला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र, तरीदेखील येथील रूग्ण संख्या वाढतच आहे. त्यामुळे या गावात तीन दिवस कडकडीत बंद जाहीर करण्यात आले असल्याची माहिती सरपंच डॉ जोस्रा पाटील यांनी दिली.

कोरोना रुग्णांत वाढ

सद्या ऐतवडेत कोरोणा संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. येथील रुग्ण विलगीकरण कक्षात न राहता घरीच उपचार घेत असल्याने दिवसोदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत मराठी शाळेचे विलगीकरण तयार केलेले कक्ष नावालाच उरले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकूण रूग्णसंख्या शंभरच्यावर गेली आहे. सद्या लॉकडाऊन असतानाही काही प्रमाणात लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी ग्रामपंचायतीने गावात २४ ते २६ मे असा तीन दिवस कडकडीत बंद घोषित केला आहे.

अत्यावश्यक सेवा सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.