ETV Bharat / state

मंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपूर येथील घराबाहेर उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे ठिय्या आंदोलन

उजनी धरणाचा पाणी प्रश्न घेऊन सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी थेट सांगलीमध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपूर येथील घरावर धडक दिली.

agitation
उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे ठिय्या आंदोलन
author img

By

Published : May 27, 2021, 4:25 PM IST

Updated : May 27, 2021, 5:18 PM IST

इस्लामपूर (सांगली) - सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणाचा पाणी प्रश्न घेऊन सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी थेट सांगलीमध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपूर येथील घरावर धडक दिली. उजनी धरणातून इंदापूर आणि बारामती या ठिकाणी पाच टीएमसी पाणी देण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. याला विरोध म्हणून सोलापूर जिल्ह्यात उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्यावतीने आंदोलन सुरू आहे.

SANGLI
शासनाचा आदेश

हेही वाचा - जायकवाडी धरणाचा पाणीसाठा फक्त 37 टक्के

पाणी देऊ नये ही मागणी घेऊन समितीचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याची भूमिका घेऊन इस्लामपूर या ठिकाणी दाखल झाले होते. इस्लामपूर येथील साखराळे येथील साखर कारखान्यावर या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं. या दरम्यान कार्यकर्त व पोलिसांमध्ये किरकोळ वादावादीचे प्रकार घडला. त्यानंतर आक्रमक पवित्रा घेत उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या दारातच ठिय्या आंदोलन सुरू केला. मंत्री जयंत पाटील यांनी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी देण्याबाबत सर्वेक्षण करण्याचे दिलेले आदेश रद्द करण्यात आल्याचे मंत्री पाटील यांच्या स्वीय सहाय्यक यांनी आदेश आंदोलकांना दाखवला. त्यानंतर सुरू असलेले आंदोलन स्थगित करत सोलापूर जिल्ह्यातही पाणी संघर्ष समितीचे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खापसे यांनी जाहीर केले.

माहिती देताना अतुल खापसे

Last Updated : May 27, 2021, 5:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.