ETV Bharat / state

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी शेतकरी संघटनेचे सांगलीत धरणे - शरद जोशी प्रणित संघटनेचे धरणे आंदोलन

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद जोशी प्रणित संघटनेने धरणे आंदोलन केले. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी असलेले नुकसान भरपाईचे शासन निकष बदलावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद जोशी प्रणित संघटनेने धरणे आंदोलन केले
author img

By

Published : Sep 3, 2019, 6:29 PM IST

सांगली - पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद जोशी प्रणित संघटनेने धरणे आंदोलन केले. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी असलेले नुकसान भरपाईचे शासन निकष बदलावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद जोशी प्रणित संघटनेने धरणे आंदोलन केले

कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. ऊस, सोयाबीन, हळद, भुईमूग अशा अनेक पिकांचे महापुरात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक हेक्टर पर्यंत जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी केली आहे.
या निर्णयावर शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने आक्षेप नोंदवला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या दोन, तीन, चार, पाच हेक्टरपर्यंत जमिनी आहेत. त्यामुळे एक हेक्‍टरपर्यंतच पीक कर्ज माफी करणे शेतकऱ्यांवर अन्याय आहे, असा आरोप शेतकरी संघटनेने सरकारवर केला आहे.

हेही वाचा - सांगलीत गणपती पंचायतनचा यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनाने नुकसान भरपाईचे लावलेले निकष बदलावेत, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज द्यावे, या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार कै.शरद जोशी यांच्या जयंतीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख संजय कोले यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

Intro:
File name - mh_sng_03_shetkari_andolan_vis_01_7203751 - mh_sng_03_shetkari_andolan_byt_04_7203751

स्लग - पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन...

अँकर - पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद जोशी प्रणित संघटनेने धरणे आंदोलन करक नुकसान भरपाईचे शासन निकष बदलावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.Body:कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरात मध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालंय,ऊस, सोयाबीन, हळद,भुईमूग अशा अनेक पिकांचे महापुरात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.त्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पर्यंतच्या शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी केली आहे.शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने आक्षेप नोंदवलाय.मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या दोन,तीन चार,पाच हजार पर्यंत जमिनी आहेत.त्यामुळे एक हेक्‍टरपर्यंत पीक कर्ज माफ करणं म्हणजे शेतकऱ्यांच्या वर अन्याय होणार असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने करत विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आहे.पूरग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन यावेळी धरणे आंदोलन करत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनाने नुकसानभरपाईचे लावलेले निकष बदलावेत,अधिकची नुकसान भरपाई द्यावी.तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा पिक कर्ज देण्यात करण्यात येत असलेली आडकाठी थांबवावी अश्या मागण्या यावेळी करण्यात आल्या,शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार कै.शरद जोशी यांच्या जयंतीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख संजय कोले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

बाईट - संजय कोले - नेते,शेतकरी संघटना.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.